मुरगूड ( शशी दरेकर ) : विकास सावंत एक आदर्श सामाजिक कार्यकर्ता. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही सामाजिक कार्याची आवड व फुले, शाहू, आंबेडकर व शिवाजी महाराजांच्या विचार घेऊन जगणाऱ्या विकास सावंत यांच्या जयंतीनिमित्त विद्या मंदिर निढोरी येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बी.एल.मोरबाळे होते . विद्या मंदिर निढोरीचे मुख्याध्यापक जी.वाय. कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार कांबळे यांनी केले.अनिसचे भीमराव कांबळे, सचिन सुतार, स्मिता कांबळे व धोंडीराम परीट (जय महाराष्ट्र) आदीनी स्वर्गीय विकास सावंत यांनी हयातभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या. विकास हा सदगुणी मुलगा होता. आणि त्याचे विचार हे चिरंतन टिकणारे आहेत . म्हणतात ना -“जो आवडतो सर्वानां , तोची आवडे देवाला “त्यामुळे ते आमच्यातून गेले असले तरी सुद्धा त्यांचा विचार व त्याचे सामाजिक भान जपण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करूया असे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
विकास सावंत त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या अनाथाश्रमांमध्ये जाऊन वृद्धांना खाऊचे तर विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करत. या कार्यकर्त्याला अल्प आयुष्य लाभले. आपल्यातून ते निघून गेले ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे .हे जरी खरे असले तरी त्यांनी दिलेला सामाजिक विचार न विसरता तीच आपल्यासाठी प्रेरणा समजून कार्य करूया असे आव्हान वक्त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बी आर बुगडे, शामराव सावंत,कृष्णा कांबळे,विक्रम पाटील, समाधान सोनाळकर, पांडुरंग सावंत, प्रदिप वर्णे,विलास कांबळे, साताप्पा भारमल, हर्षवर्धन कांबळे, प्रकाश सावंत, सात्तापा कांबळे, बंटी गुरव, धीरज कांबळे, रवींद्र कांबळे, विनायक मगदूम, सुरज कांबळे, सिद्धेश डवरी, मनोज माने,पवन माने, महेश पाटील, प्रथमेश बुगडे, पवन माने, रोहित वडर, दशरथ पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर आभार आकाश सावंत यांनी मानले.