कोल्हापूर, दि. १६ : महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET साठी पात्र विद्यार्थ्यांचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी अभिनंदन केले. संबंधित विद्यार्थ्यांनी टॅबच्या माध्यमातून नावलौकिक करावे तसेच आपली गुणवत्ता सुधारावी, असे मत श्री. लोंढे यांनी महाज्योती मार्फत आयोजित मोफत टॅब वाटप कार्यक्रमामध्ये केले.
इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या मार्फत JEE/NEET/MHT-CET चे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. प्राप्त यादीनुसार घेणाऱ्या 86 विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डाटा सिमकार्डचे वाटप करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील यांनी दिली.