मुरगूड ( शशी दरेकर ) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा-मुरगुड व सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय विवेक वाहिनी विभाग मुरगुड यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी मंडलिक महाविद्यालयात ”जोडीदाराची विवेकी निवड”संवाद कार्यशाळा संपन्न होणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा-मुरगुडचे युवा विभाग प्रमुख विकास सावंत यांनी गहिनीनाथ समाचारशी बोलताना दिली.हा कार्यक्रम प्राचार्य डॉ अर्जून कुंभार सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
विकास सावंत पुढे म्हणाले, युवा वर्गासमोर लग्नाच्या गंभीर समस्या निर्माण होताना दिसत आहेत.आजची तरुण पिढी प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून न घेता, आकर्षणालाच प्रेम समजून लग्नाच्या बेड्यामध्ये अडकताना दिसत आहे.या चुकीच्या निर्णयामुळे सहजीवनातला आनंद संपुष्टात येत आहे.त्यामुळे जोडीदाराची निवड करण्यापूर्वीच जोडीदार निवडीचे निकष ठरविण्याची गरज आहे.यासाठीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती संपूर्ण महाराष्ट्रभर “जोडीदाराची विवेकी निवड” हि संवाद कार्यशाळा राबवत आहे.
हा कार्यक्रम सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड च्या सभागृहात शनिवार दिनांक. 18 मार्च 2023 रोजी सकाळी 9.00 सपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी संवादक म्हणुन महाराष्ट्र अंनिसचे राज्यसरचिटणीस कृष्णात स्वाती,जोडिदाराची विवेकी निवड विभागाचे राज्याचे प्रमुख हर्षल जाधव, कोल्हापूर जिल्हा अंनिसचे प्रधान सचिव हरी आवळे, मुरगुड शाखेच्या प्रधान सचिव सारीका पाटील उपस्थित राहणार आहेत.तरी मुरगुड आणि मुरगुड पंचक्रोशीतील युवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुरगुड शाखेचे युवाविभाग प्रमुख विकास सावंत यांनी केले.
या कार्यक्रमासाठी अंनिस मुरगुडचे कार्याध्यक्ष शंकर कांबळे,उपप्राचार्य टि.एम.पाटील,विवेक वाहिनी विभागाचे प्रा.डॉ.फराकटे सर,कोल्हापुर जिल्हा अंनिसचे सोशल मीडिया कार्यवाह सचिन सुतार, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे कार्यवाह समिर कटके,महिला विभाग कार्यवाह स्मिता कांबळे,अंनिस मुरगुडचे सर्व कार्यकर्ते व विवेक वाहिनी विभागाचे सर्व प्राध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.