धूम स्टाईलने पैशाची पिशवी पळवली

कागल : कागल येथील चंद्रशेखर महादेव चव्हाण (रा. मुजुमदार पार्क पसारेवाडी प्लॉट नं. 54 कागल) यांना घराबाहेर ‘पत्ता कोठे आहे’ असे विचारायच्या बहाना करून जबदस्तीने हिसका मारून त्यांच्या हातातील पैश्याची पिशवी चोरट्यांनी लंपास केली.

Advertisements

अधिक माहिती अशी की अनोळखी दोन इसम अंदाजे 20 ते 25 वयोगटातील दोन्ही इसम रंगाने निमगोरी तब्येतीने साधारण जाड असलेली मोटरसायकलने चव्हाण यांच्या जवळ येऊन पत्ता विचारण्याचा बहाना करून त्यांच्या हातातील पैश्याची पिशवी जबरजस्तीने हिसकावून घेऊन मोटरसायकल वरून पळुन जात असताना.

Advertisements

चव्हाण यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असताना यांना ढकलून दिलेने ते खाली पडले व आरडाओरडा केलने घरातील मुलगा य पत्नी मदतीला धावून आले पण तोपर्यंत चोरटे येथून पळून गेले होते. 1, 35, 230 /- रुपये त्या पिवळ्या रंगाची कापडी पिशवी होते ते चोरट्यांनी लंपास केले. सदर चोरीची तक्रार कागल पोलीस ठाण्यात नोंद केली असून सदर गुन्हाचा तपास पो.हे.कॉ. पाटील करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!