मुरगूड ( शशी दरेकर ) :
१५० भगिनींसमवेत भाऊबीज ओवाळणीचा कार्यक्रम, वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांचा स्तुत्य उपक्रम

मुरगूड येथील वनश्री मोफत रोपवाटिकेचे संचालक वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे मुरगूड मध्ये आरोग्य विभाग भगिनी समवेत भाऊबीज ओवाळणी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर हे होते. तर संघटनेचे व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष तुकाराम भारमल, शशी दरेकर ,कॉ. बबन बारदेस्कर, सर्जेराव भाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रामध्ये पार पडलेल्या या उपक्रमाचे हे सोळावे वर्ष आहे.
या वर्षीही दीपावली निमित्त मुरगूड मधील आरोग्य विभाग भगिनी यांना पत्रकार बांधव व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भाऊबीज ओवाणीचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे आर डी चौगले,रामचंद्र रणवरे,प्रदिप वर्णे,भिकाजी कांबळे,प्रशांत कांबळे यांच्यासह आरोग्यविभाग भगिनी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत-प्रास्तावित प्रविण सुर्यवंशी यांनी तर आभार ओंकार पोतदार यांनी मानले.

चौकट-
“वनश्री मोफत रोपवाटिका ही संस्था स्वखर्चाने सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणून सर्व परिचीत आहे. सातत्यपूर्ण उपक्रम राबवणे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचा खंड पडू नये हे संस्थेचे वैशिष्ट्य असून या संस्थेचे संचालक वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी हे स्वखर्चातून अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम नेहमी राबवताना दिसतात. ज्यामध्ये वृक्ष रक्षाबंधन, बियांची हवाई पेरणी, झाडांचा वाढदिवस, दीपावली भाऊबीज निमित्त आरोग्य विभाग भगिनी, ऊस तोडणी कामगार भगिनी, खुदाई कामगार भगिनी, तसेच वृद्ध सेवा श्रम वंदूर येथील भगिनी यांना दीपावली भाऊबीजेला साडी व फराळ यांची ओवाळणी, तसेच गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त उपेक्षित कष्टकऱ्यांचा सत्कार, व्याख्यान व झुणका भाकर वाटप, तसेच थंडीच्या दिवसात निराधार-निराश्रीतांना मायेची उब देणाऱ्या ब्लॅंकेटचे वाटप, वनश्री मोफत रोपवाटिकेचे माध्यमातून रोपांचे मोफत वाटप,शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत स्वखर्चातून राबविले जातात. “