कागल प्रतिनिधी: ऐन सणासुदीच्या काळात कागलच्या गैबी चौक येथील मुख्य बाजारपेठ येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून यामुळे व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात दहशतीच्या छायेत आहे. या कुत्र्यांबाबत कागल नगरपालिका प्रशासन काय करणार आहे? याबाबत नागरिक विचारत आहे.
बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर असतो खरेदी विक्रीसाठी व्यापारी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते. त्याचवेळी सदर बाजारपेठेमध्ये भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सोश्वत झाला असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही भटकी कुत्री येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत अनेक कुत्र्यांना रेबीज असण्याचा धोका संबोध असल्याने हा धोका आणखीन पटीने वाढला आहे.

मध्यंतरी कागल नगरपालिकेच्या वतीने अशा भटक्या कुत्र्यांबाबत पकडून त्यांचे निर्भीजीकरण करण्यात आल्याची मोहीम सुरू केली होती, या मोहिमेस जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे पण त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा कागल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे तसेच कागल शहरातील बस स्थानक, यशवंत किल्ला परिसर, आझाद चौक सनगर गल्ली, सुभाष चौक येथे भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात वावरत असतात.
ही भटकी कुत्री परिसरातील वयोवृद्ध नागरिक व शालेय मुले यांच्यावर अंगावर धावून जात आहे. अशा तक्रारी आले आहेत पण कागल नगरपालिकेपर्यंत तर्फे यावर कोणतीही अजून कारवाई झालेली नाही.
- Help to avoid premature tire wear or blowouts from under-inflated tires,increase fuel efficiency, safety and control, ex…
- Applicable to car,motorcycle, bicycle and so on Visually alerts you when the tire preure is low to help avoid premature …
- Enhances road handling, increases economy, extends tire life Green/yellow/red system indicates level of proper tire infl…
तसेच एखादेवेळी कुत्रा चावल्यास रेबीज लसीसाठी कागलच्या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रात केली असता तेथे रेल्वेची लस उपलब्ध नाही. असे सांगितले जाते याबाबत अधिक चौकशी केल्यावर सध्या लस्सीचा तुटवडा असून वरूनच लस आलेली नाही असे सांगण्यात येते.
त्याचप्रमाणे येथील स्टाफ मोठ्या प्रमाणात निष्काळजी आहे व तो कोणाच्या ऐकत नाही अशी वारंवार तक्रार आलेली आहे यासाठी कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात लस घेण्यासाठी जावे असा सल्ला येथे देण्यात येतो.
अनेकदा अशी माहिती मिळाली आहे की महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातून मोठ्या प्रमाणात ही भटकी कुत्री विविध मार्गाने कागल शहरांमध्ये दाखल होत असतात.