वाचा गहिनीनाथ समाचार अंक १० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक १० दिनांक १०-११-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

Advertisements

सुनिता जोशी यांचे निधन

मुरगूड ता. कागल येथील सौ. सुनिता सदाशिव जोशी(वय ८३) यांचे निधन झाले.जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या मांगनूर शाखेचे निवृत्त मुख्याध्यापक, आदर्श कलाशिक्षक व लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे निष्ठावंत सहकारी एस. व्ही. जोशी यांच्या त्या पत्नी तर कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलचे संस्कृत विषयाचे शिक्षक जगदीश जोशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहीत मुली, एक … Read more

पेन्शन मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन !

डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी मार्गदर्शन कोल्हापूर: जिल्हा कोषागार कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महत्त्वाचा पेन्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात Digital Life Certificate (ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र) सादर करण्यासंबंधी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या इतर अडचणींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांनी या संधीचा लाभ … Read more

गहिनीनाथ गैबीपीर उरूस 2025 — मार्ग व पार्किंग व्यवस्था

कागल : गहिनीनाथ गैबीपीर उरूस 2025 निमित्त कागल शहरात मोठ्या प्रमाणावर भक्तांचा ओघ अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कागल पोलिस ठाणे व कागल नगरपरिषद यांनी संयुक्तरित्या वाहतूक मार्ग व पार्किंग व्यवस्थेची आखणी केली आहे. उरूस काळात शहरातील रस्ते व पार्किंग व्यवस्थेसाठी विशेष योजना करण्यात आली आहे. प्रमुख मार्गांवर वन-वे (एकेरी) वाहतुकीचा मार्ग निश्‍चित करण्यात आला … Read more

महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट'(Vision Document) विकसित भारताचे स्वप्न साकारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीची बैठक संपन्न मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजे २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ Vision Document निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित  विकसित महाराष्ट्र २०४७ सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला. या बैठकीत विकसित महाराष्ट्र … Read more

मुंबईत सरन्यायाधीशांवर हल्ल्याविरोधात वकीलांचे आंदोलन, AILUचे देशव्यापी निषेधाचे आवाहन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर कोर्ट रूम परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील अंधेरी न्यायालयातील अधिवक्त्यांनी आणि ऑल इंडिया लॉयर्स युनियन (AILU)ने जोरदार आंदोलन केले. मुंबई सीजेएम न्यायालयासमोर झालेल्या या निदर्शनात अॅड. चंद्रकांत बोजगर, अॅड. बलवंत पाटील, अॅड. सुभाष गायकवाड, अॅड. नंदा सिंह, अॅड. पीएम चौधरी, अॅड. सुल्तान शेख, अॅड. यादव यांसह … Read more

मुरगूडच्या मंडलिक महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. वैष्णवी रवींद्र पोतदार प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये शहाजी लॉ महाविद्यालय कोल्हापूर ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी रवींद्र पोतदार हीने प्रथम क्रमांक पटकावून ती सदाशिवराव मंडलिक चषकाची मानकरी ठरली. रूपये ५०००/-रोख  चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –द्वितीय क्रमांक -रु.३००१/- चषक … Read more

उत्कृष्ट वक्तृत्वाच्या बळावर खासदार स्व. सदाशिवराव मंडलिक लोकनेता बनले – प्राचार्य डॉ. जी. पी. माळी

मुरगूड ( शशी दरेकर ) : उत्कृष्ट वक्तृत्वाच्या बळावर खासदार स्व. सदाशिवराव मंडलिक लोकनेता बनले. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले. ते खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, उत्कृष्ठ वक्ता मोठ्ठा नेता होतो. त्याचे मूर्तीमंत उदाहरण … Read more

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र-मुरगुड यांच्या वतीने नवदुर्गा चैतन्य देवींचा देखावा

मुरगूड ( शशी दरेकर ) – बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी निढोरी ता.कागल येथील भैरवनाथ मंदिर सार्वजनिक सभागृहामध्ये दसरा नवरात्रौ महोत्सव निमित्त नऊदुर्गा देवींचा चैतन्य देखावा प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र -मुरगुड यांच्या वतीने सादर करण्यात आला. या देखाव्याचे दिपप्रज्वलनाने व जगदंबे च्या प्रतिमापूजनाने उद्घाटन करण्यात आले . सौ जयश्री देवानंद पाटील माजी सरपंच … Read more

गांजा विकणाऱ्या तरुणाचा पैलवान क्षेत्राशी कसलाही संबंध नाही – माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी

आरोपीने चुकीची माहिती दिल्याबद्दल तीव्र संताप  मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने मुरगुड तालुका कागल येथे गांजा विकताना पकडलेल्या प्रमोद पांडुरंग भोई याचा कुस्ती अथवा पैलवान क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्याने पोलिसांना दिलेली माहिती चुकीची असून त्यामुळे पैलवानांच्या भावना दुखावल्या आहेत. मुरगुड शहरासह परिसरातील सर्व गांजा उच्चाटणासाठी पैलवान  … Read more

error: Content is protected !!