अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सावर्डे बु॥ चा तरुण ठार

परीक्षेला जातानां रितेशवर काळाचा घाला मुरगूड ( शशी दरेकर ) : माद्याळ ता. कागल गावाजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संतोष राणे यांच्या शेताजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सावर्डे बु || (ता. कागल ) येथिल मोटरसायकलस्वार रितेश तानाजी पाटील ( वय २१ ) हा जागीच ठार झाला. रितेश हा परिक्षेसाठी गडहिंग्लज येथे परिक्षेसाठी … Read more

महिलेचा हात पकडणाऱ्या आरोपीस अटक

कागल / प्रतिनिधी : महिलेचा हात पकडून अश्लील वर्तन करून पलायन करणाऱ्या आरोपीच्या हातात कागल पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या. महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांनी जलद कारवाई करीत आरोपीस अटक केली. प्रतीक उर्फ भोला तानाजी कांबळे वय वर्षे 22 ,राहणार शाहूनगर बेघर वसाहत कागल, असे गजाआड केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार तारीख 5 मे रोजी रात्री अकरा … Read more

कणेरी केबल चोरट्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या दिले हवाली

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  कणेरी येथे काल मंगळवारी दुपारी कणेरी येथील पाझर तलावाजवळ संदीप पाटील यांच्या पाण्याच्या मोटारीची २०० फूट कॉपर केबल चोरी करताना किशोर हनुमंत माने (वय ३१, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचा एक साथीदार पळून गेला, असे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. चोरी करताना पकडलेल्या केबलची किंमत सुमारे १२ … Read more

किरकोळ कारणावरून तरुणास चाकूने भोसकले

तरूण गंभीर जखमी मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव ता – कागल येथे गावातून मोठ्या आवाजात मोटरसायकल फिरवल्याचे व नाव  सांगितल्याच्या कारणावरून तरुणास चाकूने भोसकून गंभीर जखमी केले आहे. यामध्ये अजिंक्य भरत एकल (वय ३३ ) हा तरूण गंभीर जखमी असून मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सीपीआर मध्ये दाखल केले आहे. याबाबत … Read more

ट्रॉलीखाली येऊन तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

मुरगूड(शशी दरेकर): सोनगे (ता. कागल) येथे घोरपडे गल्लीत टॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१०) दुपारी घडली. कु. शिवन्या विजय चिंदगे असे या बालिकेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत गावातील ट्रॅक्टर चालक दिग्वीजय विनायक कळंत्रे ( वय ३५) यांच्यावर … Read more

मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरटयाला पोलिसानीं रंगेहात पकडले

मुरगूड ( शशी दरेकर ) :मंगळवारी मुरगुडच्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी गस्तीवर असतानाच रंगेहात पकडले. रात्री उशिरा या प्रकरणी चौकशी व नोंदीचे काम पोलीस ठाण्यात चालू होते.           मुरगूडात दर आठवड्याला मंगळवारचा आठवडी बाजार होत असतो. या बाजारात मुरगुड परिसरातील २० ते २५ खेड्यांमधून शेतकरी व ग्राहक भाजीपाल्याच्या व इतर खरेदी – … Read more

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराच्या पत्नीचा जागीच मृत्यू

मुरगुड(शशी दरेकर) : दि. २९ मार्च सायंकाळी ०६:४५ च्या सुमारास कळंबा-गारगोटी मार्गावर जीवनधारा हॉस्पिटलसमोर दुधगंगा उजव्या कालव्याच्या ब्रिजवर बोरवडे गावच्या हद्दीत एक दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती राजाराम पाटील (वय ५९, रा. एरंडोळ, ता. आजरा) हे त्यांच्या पत्नी सौ. विमल निवृत्ती पाटील (वय ४८) यांच्यासोबत होंडा … Read more

कागल एमआयडीसीमध्ये कंपनीला 63 लाखांचा गंडा, तीन कर्मचारी अटकेत

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : काही दिवसांपूर्वी गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये हनुमान इंजिनिअरिंग 25 लाखाचा घोटाळा झाला होता. काही दिवस झाले त्या मागोमागे कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आर्या स्टील रोलिंग इंडिया लिमिटेड या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी कंपनीला 63 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन … Read more

भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुरगुड: कागल-मुरगुड मार्गावर भडगाव फाट्याजवळ काल सायंकाळी (दि. २६) साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात एका १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अनिल संजय गोरडे (रा. धनगर गल्ली, कागल) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत धुळाप्पा जॉग (वय २४, धंदा-मेंढपाळ, रा. वळिवडे) आणि मयत … Read more

विद्युत केबल चोरी प्रकरणी दोघांना अटक

कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील आनूर गावात शेतातील विद्युत केबल चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तानाजी हरिसिंग कळाप्पा पोवार (वय ३०) आणि सादेव लक्ष्मण दळवाळे (वय ३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथील रहिवासी आहेत. सध्या ते कागल तालुक्यातील केनवडे फाटा येथे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या … Read more

error: Content is protected !!