जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील मतमोजणी शांततेत संपन्न, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. दहाही मतदार संघातील विजयी झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत त्या त्या ठिकाणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये 271 चंदगड विधानसभा मतदार संघात शिवाजी पाटील विजयी, 272 राधानगरी विधानसभा मतदार संघात प्रकाश आबिटकर विजयी, 273 कागल विधानसभा मतदार संघात हसन मुश्रीफ विजयी, 274 कोल्हापूर … Read more

कागल विधानसभा २०२४ निकाल – हसन मुश्रीफ विजयी

26 फेरी अखेर मुश्रीफ 11879 मतांनी विजयी कागल विधानसभा २०२४ निकाल एकूण झालेले मतदान – 3,43,672  श्री. हसन मुश्रीफ – 1,43,828 श्री. समरजितसिंह घाटगे – 1,31,949 इतर – – सविस्तर माहिती पुढील प्रमाणे – मतमोजणी केंद्रावर सध्या मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून लवकरच मोजणी चालु होणार आहे बरोबर 8 वाजता मोजणी सुरू १ फेरी तील … Read more

कणेरीवाडीत युवकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  ता.22 : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील हॉटेल पार्क इन जवळील शेतकरी पेट्रोल पंपा समोर अंदाजे आज पहाटे  6 वाजून 30 मिनिटांनी अपघात झाला. या अपघातामध्ये चार चाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक देवून सुमारे 40-50 फुट फरफटत नेले यावेळी निखिल मारुती खोत (वय 28, राहणार कणेरीवाडी अक्षता मंगल कार्यालयाजवळ) या युवकाचा … Read more

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान – जिल्हाधिकारी अमोल येडगे

  कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी उत्साहाने मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांसह प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याबरोबरच कोल्हापूर जिल्हावासियांनी उत्साहाने मतदान केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज दिली … Read more

डॉ. मा. ग .’गुरव यांच्या निसर्ग कन्या बालकाव्य संग्रहास राज्यस्तरिय पुरस्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड–वाघापूर (ता.भुदरगड)येथील  बाल साहित्यिक  व राष्ट्रीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार प्राप्त डाॅ.मा.ग.गुरव यांच्या, ‘निसर्गकन्या’ या बाल काव्य संग्रहास मुंबईच्या वंदना प्रकाशन पुरस्कृत, राज्यस्तर ‘आशीर्वाद ‘,पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थापक, साहित्यिक डाॅ. सुनील सावंत यांनी ही माहिती दिली असून येत्या ३०नोव्हेंबर २०२४,रोजी,दादर-माटुंगा येथील वा. ना. गोखले सभागृहात पुरस्कार वितरण केले … Read more

निढोरीतील सेवानिवृत्त जवानाचे अपघाती निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील सेवानिवृत्त फौजी आणि छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल मधील सुरक्षा विभागाकडील सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठल हरि मगदूम ( वय ६१ वर्षे )यांचे अपघाती निधन झाले. आय.टी.बी.पी. पोलिस निलेश मगदूम यांचे ते वडील आणि आंतरराष्ट्रीय मल्ल व नामवंत कुस्ती निवेदक मारुती तथा बटू जाधव (गंगापूर) यांचे … Read more

आदमापूर यात्रा स्थळावर घाणीचे साम्राज्य सरपंचांना निवेदन सादर

निवेदनानंतर तातडीची कार्यवाही करू – सरपंचाचे आश्वासन मुरगूड ( शशी दरेकर ) : आदमापुर येथील बाळु  मामांच्या पांढरीत अगदी उड्डाण पुलानाजिक पूर्वेच्या बाजूला असलेल्या ओढ्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.     खरकट्या पत्रावळ्या,प्लास्टिक च्या पिशव्या, कागदांचे ढीग,औषधांच्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, आइस्क्रीम व खाद्य पदार्थांचे कप ,कुजलेले इतर पदार्थ आणि या सर्वांना बरोबर घेऊन संथपणे वाहणारा ओढा … Read more

क्यू मॅनेजमेंट पोर्टल देणार मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या मतदारांची संख्या

कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर शहरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी किती मतदार रांगेमध्ये उभे आहेत. हे आता आपल्याला एका क्लिकवर जाणून घेता येईल. कोल्हापूर शहरातील 274 – कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधील 186 व 276- कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधील 315 मतदान केंद्रे अशी एकूण 501 मतदान केंद्रावर रांगेत किती मतदार उभे आहेत, याची माहिती आता सहजपणे जाणून घेता येईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने … Read more

मुरगूड येथे मतदान जनजागृती प्रचार फेरी संपन्न

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल  येथील मुरगुड शहर जेष्ठ नागरिक संघ, निसर्ग वेध प्रतिष्ठान व समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदार प्रबोधन करण्यासाठी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते .          यावेळी संचालक जयवंत हावळ यांनी प्रचार फेरीचा उद्देश स्पष्ट केला . प्रचार फेरी … Read more

हुपरी येथे हृदयद्रावक घटना: मुलाने बापाचा निर्घृण खून

हुपरी(सलीम शेख): हुपरी तालुक्यातील गंगानगर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अनिल आप्पासो नुल्ले (वय ४५) याने आपल्याच वडिलांचा निर्घृण खून केला आहे. गुरुवारी रात्री, जनावरे बांधण्याच्या निमित्ताने अनिल आणि त्याचे वडील आप्पासो यांच्यात छोटासा वाद झाला. हा वाद इतका वाढला की अनिलने आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि लाकड्याच्या दाडक्याने वार केले. यामुळे आप्पासो … Read more

error: Content is protected !!