‘netflix squid game season 3’च्या तिसऱ्या सीझनमुळे चाहते नाराज; ‘स्त्रीद्वेषी’ आणि ‘प्रो-लाईफ’ अजेंड्यावर प्रश्नचिन्ह

मुंबई: जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘the squid game’ या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा आणि अंतिम सीझन २७ जून रोजी प्रदर्शित झाला आणि चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दुसऱ्या सीझनच्या नाट्यमय समाप्तीनंतर तिसरा सीझन कसा संपणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. मात्र, अनेक चाहते वेगवेगळ्या कारणांमुळे निराश झाले आहेत. अंतिम सीझन पाहिल्यानंतर लगेचच चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. … Read more

Advertisements

kannappa review : ‘कन्नप्पा’ – एक प्रामाणिक प्रयत्न!

विष्णू मांचू अभिनित ‘कन्नप्पा’ (kannappa) हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भगवान शिवाचे महान भक्त कन्नप्पा यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट, दिग्दर्शक मुकेश कुमार सिंग आणि मुख्य अभिनेता तथा कथालेखक विष्णू मांचू यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. कथा: चित्रपटाची कथा तिन्नाडू (विष्णू मांचू) या नास्तिक आदिवासी तरुणाभोवती फिरते, जो पुढे जाऊन भगवान शिवाचा परमभक्त … Read more

अक्षय कुमारचं ‘हेरा फेरी 3’ वादावर मोठं विधान

“जे काही होत आहे, ते तुमच्या समोरच…” मुंबई: ‘हेरा फेरी 3’ चित्रपटातील परेश रावल यांच्या बाहेर पडण्यावरून सुरू असलेल्या वादावर अभिनेता अक्षय कुमारने अखेर आपलं मौन सोडलं आहे. अक्षय कुमारने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं आहे की, “जे काही होत आहे, ते तुमच्या समोरच होत आहे. मी बोटांवर क्रॉस करून आशा करतो … Read more

उत्कंठावर्धक ‘वेड’ लावणारा टिझर…

टिझरने ’वेड’ बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षयकुमारला देखील लावले.अभिनेता रितेश देशमुख यांनी आपले मित्र अक्षय कुमार यांना वेड चा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि तो त्यांना इतका आवडला कि त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून लगेचच शेअर केला. 20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या ’वेड’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टिझर
नुकताच सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार
या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली
आहेत. तर गीते अजय -अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत.

सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत. जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज या चित्रपटाचा टिझर मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता या टिझर द्वारे निर्माण झाली आहे.

पावसाळी पर्यटकांना खुणावतेयं साके चे भैरवनाथ मंदिर

साके धबधबा

डोंगर कुशीतील निसर्गरम्य ,पश्चिम महाराष्ट्रातील नवसाला पावणारे एकमेव मंदिर साके (सागर लोहार) : कागल तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत डोंगर कपारीत वसलेलं एक छोटस साके गाव येथील श्री ग्रामदैवत म्हणजे नवनाथापैकी एक नाथ भैरवनाथ नवसाला पावणारे दैवत असल्यामुळे माहेरवाशींनी व कोल्हापूर,सांगली,मिरज पुणे -मुंबई येथील भाविक भक्तगण या भैरोबाच्या पवित्रस्थळी लक्षणी वर्णी लावतातत. पंचक्रोशीतील नवसाला पावणा-या ग्रामस्थांचे … Read more

error: Content is protected !!