आमदार हसन मुश्रीफ यांच्या मंत्रीपदाने कागल मध्ये जल्लोष

कागल (प्रतिनिधी) : कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे नवव्यांदा मंत्री झाले. त्यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली अन् कागलमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आनंदोत्सव साजरा केला.        महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर कागल मतदारसंघातील कार्यकर्ते सकाळपासूनच चार्ज झाले होते. शपथविधी सोहळा मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी मुश्रीफ  प्रेमी कार्यकर्त्यांनी येथील गैबी चौकात मोठे … Read more

Advertisements

गारगोटी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना अभिवादन

मुरगूड (शशी दरेकर) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड , राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 13/ 12/ 1942 गारगोटी स्वातंत्र्य लढ्यातील शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतिप्रित्यर्थ  हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. या घटनेला जवळपास 82 वर्षे लोटली असली तरीसुद्धा त्यांच्या आठवणी आज देखील क्रांतीज्योतीच्या रूपाने तितक्याच ताज्या आहेत. आपल्याच भागातील संकेश्वरचे हुतात्मा … Read more

दिलखुलास, जय महाराष्ट्र कार्यक्रमात डॉ. सदानंद मोरे यांची विशेष मुलाखत

मुंबई: मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्याचा केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याअनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांच्या विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. … Read more

मुरगुडात ऋणानुबंध ४ या घराचा उद्घाटन सोहळा इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न

मुरगुड (शशी दरेकर) – “ऋणानुबंध ४ ” या घराचा उद्घाटन सोहळा इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. गरीबाच्या घराची स्वप्नपूर्ती पाहण्यासाठी अख्खा गल्लीबोळ या वास्तुकसाठी हजर होता. ग्रंथरूपाने आहेर देऊन वास्तू उभारणीतील सर्व घटकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खारीचा वाटा या सोशल मीडिया ग्रुपने मुरगूडातील दारिद्र्यात खितपत पडलेल्या सहा सदस्यांच्या कुटुंबासाठी घर बांधण्या करीता … Read more

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी – समरजितसिंह घाटगे

कागल मध्ये विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा कागल(प्रतिनिधी) : देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब 84 वर्ष पूर्ण करून  85  व्या वर्षात प्रवेश करीत आहेत. या वयातही  त्यांचा राजकीय- सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रातील   उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल येथे शरदचंद्र पवार यांच्या … Read more

लक्ष्मीनारायणच्या शेळेवाडी शाखेतर्फै ४१ लाखांची एसकॉर्ट क्रेनचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल सर्व परिचीत असणारी सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शेळेवाडी ता . राधानगरी शाखेतर्फे येथिल कर्जदार श्री . संतोष मांगले यानां नवीन एक्सकॉर्ट फायटर क्रेन या वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत ४१ लाख रुपये कर्ज वितरण संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री . … Read more

करनूर येथे रक्तदान शिबिर संपन्न

कागल (विक्रांत कोरे) :करनूर(ता.कागल)येथे रक्तदान शिबिरात पार पडले, राजर्षि  छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय,छत्रपती प्रमिलाराजे रक्तपेढी कोल्हापूर व थॅलेसेमिया निर्मूलन असोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर संपन्न झाले.मरीआई मंदिर येथे हे शिबिर आयोजित केले होते.                                          वाढत चाललेली रक्ताची मागणी, रक्ताचा होत असलेला अपुरा पुरवठा या अनुषंगाने  आशा गटप्रवर्तक सुप्रिया गुदले यांच्या पुढाकारातून हे शिबिर … Read more

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तरसूचीबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास 16 डिसेंबर अखेर परिषदेकडे पाठवावेत

कोल्हापूर (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास दि. 16 डिसेंबर 2024 … Read more

सहा पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र व्दितीय स्थानी

सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य  विशेष पंचायत या श्रेणींमध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायत अव्वल नवी दिल्ली : महाराष्ट्राने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार -2024 मध्ये सहा राष्ट्रीय पुरस्कार  मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. ओडिशा आणि त्रिपुरा राज्याने प्रत्येकी सात पुरस्कारांसह संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर तर बिहार आणि हिमाचल प्रदेश राज्यांनी प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार … Read more

शिवाजी विद्यापीठ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठसाठी व्हॉलीबॉल संघाची स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाची निवड झाली असून हा संघ 14 ते 18 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होत आहेत.            शिवाजी विद्यापीठ संघातील खेळाडू असे : ओंकार लोकरे, विवेक चौगले, सत्यजित शिंदे (मंडलिक … Read more

error: Content is protected !!