ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कायद्याचे उल्लंघन

कागल (विक्रांत कोरे) : कागल व परिसरातील गणेश मंडळांकडून ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कायद्याचे उल्लंघन  झाले आहे .अशा एकूण 14 गणेशोत्सव मंडळांवर कागल पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे प्रचलित कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

Advertisements

           कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, कागल पोलीस ठाणे अंतर्गत 288 गणेशोत्सव मंडळे आहेत. श्री गणपती बाप्पांचे आगमन झाले त्या दिवशी काही हौशी १४ मंडळानी मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन  केले आहे .राजे ग्रुप (अर्जुन नगर मौजे सांगाव ),शंभूराजे मित्र मंडळ (मौजे सांगाव), शिवाजी तरुण मंडळ (मौजे सांगा), कट्टा ग्रुप( मौजे सांगाव), जिजामाता फ्रेंड सर्कल (कागल), अजिंक्यतारा अष्टविनायक मित्र मंडळ( बानगे), गणेश तरुण मंडळ( गोरंबे), आदर्श सांस्कृतिक कला मंडळ  (केनवडे), तिरंगा विकास मंच (केनवडे) 11 बॉईज (अनंत रोटो (कागल ),अखंड ग्रुप( कागल), गणेश मित्र मंडळ (कागल), हनुमान तालीम मंडळ( शाहूनगर कागल ),नावेद मुश्रीफ युवा मंच (कागल), या अशा चौदा मंडळावर कायदेशीर कारवाई कागल पोलिसांकडून करण्यात आली आहे.

Advertisements

          गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना कायद्याचे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या सूचना केल्या होत्या. संस्कृती कार्यक्रम करत असताना महिलांचे अश्लील हावभाव असणारे नृत्य, अश्लील गाणी असणारे कार्यक्रम, आयोजित केल्यास संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावर व  आयोजकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे, त्याचबरोबर मानवी दृष्टीस व आरोग्यास घातक असलेल्या लेसर लाईटच्या तिव्र किरणांचा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचना परत पुढे केल्या जात आहेत. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव काळात कोणत्याही मंडळाकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही .याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी ,असे आवाहन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले आहे.

Advertisements
AD1
4 thoughts on “कागल व परिसरातील १४ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल”
  1. helloI really like your writing so a lot share we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this house to unravel my problem May be that is you Taking a look ahead to see you

  2. Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to more added agreeable from you By the way how could we communicate

  3. I just could not depart your web site prior to suggesting that I really loved the usual info an individual supply in your visitors Is gonna be back regularly to check up on new posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!