बाल कीर्तनकार रणवीर गुरव यांच्या  किर्तनाने श्रोते भक्ती रसात न्हावून निघाले

कागल (कृष्णात कोरे) : संतांच्या विचारधारेतून नामस्मरण हाच खरा आधार आहे.नामस्मरणामुळे मनाची शुद्धता होत असते. ईश्वराच्या प्राप्तीसाठी नामस्मरण हाच खरा सोपा मार्ग आहे. असे मौलीक विचार बाल कीर्तनकार ह भ प रणवीर गुरव यांनी उपस्थित श्रोत्यांना दिले.लिंगनूर दुमाला, तालुका -कागल येथील हनुमान मंदिर च्या प्रांगणात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संतांच्या विचारप्रणालीतून आणि केलेल्या समाजप्रबोधनातून भक्तीरसातून श्रोते झाले ओलेचिंब.

Advertisements

          बाल कीर्तनकार यांचे वय 14 वर्षाचेआहे . त्यांचे शिक्षण कमी आहे. संतांच्या विषयी त्यांनी वाचन केले आहे. त्यानी कीर्तनाचे ज्ञान अवगत केले आहे. आता त्यांचे कीर्तन म्हटले की दर्दी श्रोते, अलोट गर्दी करतात.पहिले बाल कीर्तनकार म्हणून कीर्तनातून आणि समाज प्रबोधनातून त्यांनी आपला ठसा उमटविला उठविला आहे.

Advertisements

संतांच्या विचारधारेतून लहान वयातच समाजप्रबोधनाचे कार्य ते करीत आहेत.

नाम संकीर्तन साधन पै सोपे /
जळतील पापे जन्मांतरीची //
न लगती सायास जावे वनांतरा /
सुखे येतो घरा नारायणा //

          भगवंतांच्या  या अभंगावर निरूपण करताना, आणि भगवंतांच्या नामाचा महिमा आपल्या बालवाणीतून सोप्या शब्दात ते सांगतात. कीर्तनातून ते म्हणतात, जीवनात येणारी संकटे व अडचणी दूर करण्याचे साधन म्हणजे किर्तन होय. ईश्वर प्राप्ती करावमाची, ईश्वराचे नाम जप करावे.ही काळाची गरज आहे. मानव जन्माचे महत्त्व अधोरेखित करताना संतांच्या विचारानुसार नामस्मरण हाच खरा जीवनाचा आधार आहे.

               कीर्तनात बाल कीर्तनकार ह भ प रणवीर गुरव पुढे सांगतात, परमेश्वराच्या नामस्मरणामुळे मन शुद्ध होते विचार सकारात्मक बनतात.सकारात्मतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. सुसंस्कृत होणे आणि मनातील हाच खरा हेतू कीर्तनाचा असतो. मानव केवळ पैसा मिळवणे हाच हेतू समोर ठेवतो. त्यामुळे सर्वत्र अशांती पसरत आहे. ऋषीमुनीनी हजारो वर्षांच्या तपानंतर  त्यानी सामर्थ्य मिळविले आहे.व्यवहारिक प्रगती कमी असते. अध्यात्मिक प्रगती ही अनंत काळासाठी फलदायी ठरत असते.असे संतांच्या  मौलिक विचारांची पेरणी बाल कीर्तनकार रणवीर गुरव यांनी केली आहे.

             लहान वयातच संतांच्या विचारांचा गाभा आत्मसात करून प्रभावीपणे सादरीकरण करणाऱ्या ह भ प रणवीर संजय गुरव महाराज यांच्या कीर्तनाने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. लिंगनूर दुमाला येथील भजनी मंडळाने टाळकरी म्हणून उत्कृष्ट साथ दिली

            व्यासपीठ चालक ह भ प बळीराम तांबेकर, चोपदार प्रशांत संकपाळ, मृदुंग साथ ह. भ. प.अथर्व आवटे,तसेच गावातील चंद्रकांत तोडकर,आनंदा पोकले, अर्जुन तोडकर,विठ्ठल कुंभार,शिवाजी पाटील,सतीश माने,अशोक संकपाळ, यांच्यासह गावातील तरुण मंडळा°चे कार्यकर्ते व भाविक-भाविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!