मुरगुड ( शशी दरेकर ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित वडगाव हायस्कूल जुनियर कॉलेज वडगाव ता. हातकणगले या शाळेच्या प्राचार्यपदी लक्ष्मण तथा बाळ डेळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
बाळ डेळेकर गेली 25 वर्ष कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था कोल्हापूरच्या संचालक पदी कार्यरत आहेत. दोन वेळा या संस्थेचे ते अध्यक्ष झाले होते .शाहू हायस्कूल जुनिअर कॉलेज कागल येथे ते सध्या उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. शिक्षक म्हणून त्यानी तेहतीस वर्षे सेवा केली आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात ते कार्यरत आहेत. एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड चे ते माजी विद्यार्थी होत. सध्या शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेवर कौन्सिल मेंबर या पदावर ते कार्यरत आहेत. बाळ डेळेकर सर यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर आपला वेगळा ठसा सर्वच क्षेत्रात उमठवला आहे. एक विद्यार्थी प्रिय, समाज प्रिय शिक्षक आज एका नामांकित स्वातंत्र पूर्व काळात स्थापन झालेल्या शाळेचे प्राचार्य झाल्याचा अभिमान त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना वाटत आहे.
या कामी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई ,अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन, डॉ. मंजिरी मोरे देसाई, युवा नेते कौन्सिल मेंबर, दौलतराव देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकार यांचे प्रोत्साहन लाभले.