मुरगूड ( शशी दरेकर ) : विभागीय बॉक्सिंग स्पर्धैत मुरगूड येथिल शिवराज हायस्कूल मुरगूडच्या आयान मुजावर ( ३८ किलो ) तर ताहीर शिकलगार ( ४२ किलो ) गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तसेच मयूर अस्वले, शौर्य अस्वले, सोहम जाधव, राजवीर जाधव, श्रेयश कांबळे, अथर्व माने, सुजित कांबळे, वेदांत आसवले, इंद्रजीत माने, विघ्नेश कांबळे यानीं वेगवेगळ्या गटात दुसरा क्रमांक मिळवून यश संपादक केले.

या खेळाडूना क्रिडा शिक्षक एकनाथ आरडे, प्रशिक्षक ओंकार सुतार, एनआयएस प्रशिक्षक अतिश आरडे यांचे मार्गदर्शन तसेच सेक्रेटरी मा . खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, अध्यक्ष गजानन गंगापूरे, कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य व्ही .बी. खंदारे, उपमुख्याध्यापक पी .पी. सूर्यवंशी, उपप्राचार्य एकनाथ चौगले, नितीन चव्हाण यांचे प्रोत्साहन मिळाले.