व्हनाळी : सागर लोहार
केनवडे तालुका कागल येथील श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स या कारखान्यांमध्ये तयार झालेली आरोग्यदायी केमिकल फ्री जॅगरी पावडर बेंगलोर च्या मार्केट मध्ये पाठवण्यात आली. गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते, अन्नपूर्णा चे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जॅगरी पावडर १ किलो च्या रिटेलिंग पाउच पॅकिंग पोत्यांचे पूजन करून पहिल्या पाच हजार रिटेलिंग पावडरची ऑर्डर बेंगलोरसाठी रवाना झाली.
यावेळी अंबरिषसिंह घाटगे म्हणाले , अन्नपूर्णा कारखाने गतवर्षीचा ट्रायल सीजनमध्ये केमिकल फ्री जागरी पावडर च्या उत्पादनाला सुरुवात केली. कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये सुमारे दीड लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून यामध्ये केमिकल फ्री जॅगरी पावडर व सल्फर लेस खांडसरी साखरेचे ही चांगले उत्पादन घेतले आहे त्याला जगभरातील बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मार्केटिंग डायरेक्टर मृणालिनी साळोंखे, मार्केटिंग मॅनेजर विनायक चौगले, चिफ केमिस्ट प्रकाश कुमार माने, शेती अधिकारी भीमाप्पा चौगले ,सेल्स ऑफिसर ओंमकार पोतदार, सिद्धार्थ कांबळे, , आदी उपस्थित होते.
स्वागत कृष्णात कदम यांनी केले तर आभार दिग्विजय सूर्यवंशी यांनी मानले.