कागल : कागल तालुक्यातील 39 गावांचा गावठाण ड्रोनसर्वेक्षण सदोष सनदा भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामपंचायतचे स्थानिक पातळीवर विशेष कॅम्प (मोहीम) कार्यक्रम आयोजित करून सनदा दुरुस्तीचे काम त्वरित करावे अन्यथा सोमवार दि.२६ डिसेंबर रोजी सरपंच परिषद मुंबई संलग्निक कागल तालुका परिषदेच्या वतीने उप अधीक्षक भूमी अभिलेख कागल कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच परिषदेचे तालुका निमंत्रक ॲड दयानंद पाटील -नंद्याळकर (अध्यक्ष चिकोत्रा जनआंदोलन ) यांनी दिला. कागल तालुक्यातील ग्रामपंचायतचे याबाबतचे ठराव सह जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर सुदाम देसाई यांच्याकडे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कागल तालुक्यातील 39 गावांचा गावठाणातील मिळकतींचा ड्रोन सर्वे सन 2019/ 20 व 2020 /21 मध्ये झाला होता .या ड्रोन सर्वे मध्ये गंभीर त्रुटी असून ग्रामपंचायत मिळकत धारकांच्या चुकीच्या नोंदी झालेले आहेत. काही ग्रामपंचायत मिळकत धारकांच्या नोंदी दुसऱ्यांच्या नावे झालेले आहेत. सदोष पद्धतीने तयार झालेल्या सनदा हा अधिकृत दस्तऐवज असल्यामुळे मिळकतीचे बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार होऊन भांडण तंटे होत आहेत . वहिवाट व गावठाण पत्रकाप्रमाणे ड्रोन सर्वे नोंदी झालेले नाहीत. ग्रामपंचायत कडील मिळकत पत्रके याची पडताळणी करूनच सनदा तयार करणे आवश्यक आहे .
याबाबतीत मे. आयुक्त (महसूल) पुणे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांच्याकडे निवेदन दिले होते. तसेच लक्ष वेधणे करता उपअधीक्षक भूमी अभिलेख, कागल कार्यालयावर, सरपंच परिषदेमार्फत दिनांक 3 जुलै रोजी मोर्चा व आंदोलन केले होते.
भूमी अभिलेख कार्यालयाकडून सदोष पद्धतीने केलेला सनदा घेणे करता सक्ती होत आहे, या सनदा दुरुस्ती बाबत भूमी अभिलेख कार्यालयाकडे मिळकत धारकांनी अनेक वेळा हेलपाटे मारून दाद मिळत नाही. म्हणून कागल तालुक्यातील जनतेला आंदोलन करणे भाग पडत आहे. निवेदनावर सौ. राजश्री दयानंद पाटील (अध्यक्षा), सौ.संपदा दीपक कुंभार (महिला आघाडी अध्यक्षा), सौ.सुमन विलास जाधव (कार्याध्यक्ष ),अनिल कांबळे (सरचिटणीस) ,आनंदा पाटील (सरपंच बेलवाडी मासा) ,तुकाराम माने (सरपंच बोलावीवाडी ),महादेव कामते मेतके ,सोनिया शिंदे (सरपंच बसतवडे), आनंदी पाटील (सरपंच मेतके ),अरुण यमगेकर (सरपंच ठाणेवाडी ), प्रदीप पाटील (सरपंच अर्जुनवाडा) यांच्या सह्या आहेत