कोल्हापूर, दि. 20 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिक मुला/मुलींच्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत असून दि. 1 जून 2023 पासून प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली आहे.
प्रथम प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 असून सर्व युध्द विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व त्यांची अनाथ पाल्ये यांनी याचा लाभ घ्यावा. शिल्लक राहिलेल्या जागा सामान्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.
सैनिकी मुलांचे वसतिगृह, रमण मळा, कोल्हापूर – क्षमता 100 व सैनिकी मुलींचे वसतिगृह, लाईन बाजार रोड, कसबा बावडा कोल्हापूर वसतिगृहाची क्षमता 100 आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी खालीलप्रमाणे प्राधान्य देण्यात येईल :-
युध्द विधवा / माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये व माजी सैनिकांची अनाथ पाल्ये, पदव्युत्तर (व्यावसायीक, वैद्यकीय अभियांत्रिकी, व्यवसायीक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारी पाल्ये). बी.एड.,डी. एड., पदवी अभ्यासक्रम (गुणवत्ता यादीप्रमाणे), 12वी, 11 वी व 10 वी या क्रमाने (गुणवत्ता यादीप्रमाणे), माजी सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य व जागा उपलब्ध असल्यास सिव्हिलियन पाल्य (मा. संचालकांच्या परवानगीने) याप्रमाणे राहिल.
- संपर्क :
- अधिक्षक सैनिकी मुलांचे वसतीगृह, कोल्हापूर दुरध्वनी क्र. – ८६९८४५३३९२
- अधिक्षिका सैनिकी मुलींचे वसतीगृह, कोल्हापूर दुरध्वनी क्र. – ७७८०९९२०३२
- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दुरध्वनी क्र.- ०२३३-२९९०७१२