महिलेचा हात पकडणाऱ्या आरोपीस अटक

कागल / प्रतिनिधी : महिलेचा हात पकडून अश्लील वर्तन करून पलायन करणाऱ्या आरोपीच्या हातात कागल पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या. महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांनी जलद कारवाई करीत आरोपीस अटक केली.

Advertisements

प्रतीक उर्फ भोला तानाजी कांबळे वय वर्षे 22 ,राहणार शाहूनगर बेघर वसाहत कागल, असे गजाआड केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार तारीख 5 मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेच्या दारात, बेघर वसाहत कागल येथे घडला.

Advertisements

        कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तारीख 5 मे रोजी रात्री अकरा वाजता पीडित महिला शाहूनगर बेघर वसाहत येथील आपल्या दारात भांडी घासत होती. आरोपी प्रतीक उर्फ भोला कांबळे हा मोटरसायकल वरून तेथे गेला.

Advertisements

त्याने मोटरसायकलचा हॉर्न जोर-जोरात वाजवत, गाडी रेस करू लागला. त्या महिलेस तू माझ्यासोबत चल असे म्हणून त्याने तिचा हात धरला .वाईट हातवारे केले तिच्या मनाची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. या प्रकारानंतर आरोपीने तेथून पलायन केले. व तो बेपत्ता झाला.

       या घटनेची नोंद तारीख 6 मे रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास कागल पोलीस ठाण्यात झाली. पोलीस आरोपीच्या शोधात होते. गुप्त माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे, पोलीस अंमलदार प्रभाकर पुजारी, शंकर काशीद ,जस्मिन शेख, तेजस्विनी पाटील ,राधिका कारेकर ,सुनिता जोडगुद्री यांनी आरोपीला गजाआड करण्याची मोहीम फत्ते केली. पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नागेश खैरमोडे हे करीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!