मुरगूडला बीएससी नर्सिंग महाविद्यालयाची मान्यता

ग्रामीण व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणार शासकीय आणि खाजगी सेवेत नोकरीची संधी – खासदार प्रा. संजय मंडलिक यांची माहिती

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड (ता . कागल )येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या सदाशिवराव मंडलिक इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या बी.एस.सी. नर्सिंग या चार वर्षाच्या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मान्यता दिल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी व जिल्ह्याचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisements

मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात २०२२- २०२३ पासून ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या या महाविद्यालयास डोंगरी भागासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आहे. ४ वर्षाच्या पदविनंतर विद्यार्थ्यांना शासकीय व खाजगी वैद्यकिय क्षेत्रात कामाची संधी मिळणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.

Advertisements

पत्रकार परिषदेत खासदार मंडलिक म्हणाले, ” कोरोना काळात संपूर्ण देशभर वैद्यकीय डॉक्टरांची उणीव मी पाहत होतो. त्यातूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय निर्माण करणाऱ्या दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी सुरू केलेल्या मुरगूडच्या जय शिवराय एज्युकेशन सोसायटीत वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करावा अशी प्रेरणा मिळाली.

Advertisements

३१ शाखातून ८ हजार विद्यार्थांना ज्ञानदानाचे काम करणाऱ्या या संस्थेमार्फतच बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. गिरीष महाजन, पालकमंत्री दीपक केसरकर, माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयास मान्यता मिळाली.

चार वर्षाच्या अभ्यासक्रमाची पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यास शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात संधी मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा व कागल तालुक्यातील दुर्गम व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना यातून नोकरी, रोजगार व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

या महाविद्यालयाच्या पाठपुराव्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष अँड. वीरेंद्र मंडलिक, संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे, डॉ. प्रसाद फुटाणे, डॉ. रवींद्र हत्तरगी, डॉ.रणजीत कदम, मानसोपचार तज्ञ डॉ. बेळगुंद्री यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया……
बारावी विज्ञान विभागात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना केंद्र शासनाच्या नीट(NEET) परीक्षेतील गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने जून २०२३ पासून प्रवेश दिला जाणार आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!
PM Kisan 20 वीं किस्त: कब और कैसे पाएं ₹2000? India’s Hottest Picks: Top 10 Trending Stocks of 2025! जागतिक वन दिन 2025 Book HSRP Plate Process Step by Step kagal vidhansabha voting 2024