सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : मुश्रीफ फाउंडेशन व ग्रामपंचायत सिद्धनेर्लीच्या वतीने येथील ग्रामपंचायत सभागृहा मध्ये आभाकार्ड काढण्याचा कॅम्प घेण्यात आला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून आभा कार्ड काढून घेतले. डेंगू साथीचा प्रभाव फैलावू नये म्हणून त्यावरील प्रभावी उपाय योजनाची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी फारूक देसाई यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनेर्लीच्या वैद्यकीय अधिकारी मंगला ऐनापुरे यांनी भविष्यात आभाकार्ड किती फार गरजेचे आहे याची माहिती उपस्थितीना दिली.
सरपंच दत्तात्रय पाटील म्हणाले की,आभाकार्ड प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होणार आहे तरी सर्वांनी ही तातडीने आभाकार्ड काढून घ्यावे. सिद्धनेर्लीच्या सर्व आशा सेविकांना उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल पावसाळी रेनकोट व बॅग असे किट ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले.
कॉ. शिवाजी मगदूम, संदीप पाटील, मनोहर लोहार, किसन मेटील आदीनी यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका अधिकारी वनिर नाईक, अनिल जोशी या वैद्यकीय अधिकाऱ्यासह आशा वर्कर तसेच ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले आभार विजय कुरणे यांनी मानले.