कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी तर्फे राम मंदिर येथे करण्यात आली आरती

कागल : कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता बऱ्याच कालावधीनंतर आज मंदिरे भाविकांसाठी दर्शनाकरिता खुली करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. समस्त मानव जातीवर आलेले हे संकट लवकर टळू दे आणि सर्व सामान्यांचे जीवन पूर्वपदावर येऊ दे,अशी मनोभावे प्रार्थना करुन कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी तर्फे प्रभु श्री राम मंदिर येथे आरती करण्यात आली तसेच कागल चे ग्रामदैवत गहिनीनाथ गैबीपीर दर्गा येथे प्रार्थना करण्यात आली.

Advertisements


यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस अध्यक्ष संजय चितारी,उपनगराध्यक्ष विवेक लोटे, नगरसेवक आनंदा पसारे, बाबासो नाईक, गंगाधर शेवडे, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर, जावेद नाईक, शाहनुर पखाली, सुरेश शिंदे, बच्चण कांबळे, सोहेल मुजावर, राहुल गाडेकर, निशांत जाधव, राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!