परीक्षेला जातानां रितेशवर काळाचा घाला
मुरगूड ( शशी दरेकर ) : माद्याळ ता. कागल गावाजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संतोष राणे यांच्या शेताजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सावर्डे बु || (ता. कागल ) येथिल मोटरसायकलस्वार रितेश तानाजी पाटील ( वय २१ ) हा जागीच ठार झाला. रितेश हा परिक्षेसाठी गडहिंग्लज येथे परिक्षेसाठी जात असतानां त्यांच्यावर काळाचा घाला पडला. अपघाताची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी रितेश पाटील हा सावर्डेचा युवक मोटरसायकल ( क्र. एमएच ०९ एफटी २४५१ गडहिंग्लजला परिक्षेसाठी जात होता. माद्याळ ता. कागल गावच्या हद्दीत संतोष राणे यांच्या शेताजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात गाडीच्या टाकीचा पत्रा फाटून रितेशच्या उजव्या मांडीला कापला व त्यानां जोराचा मार लागला. त्यामुळे रितेश जागीच गतप्राण झाला .

अपघाताची फिर्याद दिपक यशवंत पाटील यानीं मुरगूड पोलिस ठाण्यात दिली. पोलिसानी मृतदेह मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उत्तरणीय तपासणी करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री शोकाकूळ वातावरणात सावर्डे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात वडील, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.