पैशाचे पाकीट ज्येष्ठ नागरिकाला वडाप वाहतूकदाराने केले प्रामाणिकपणे परत

मुरगूड ( शशी दरेकर ): यमगे ता. कागल येथील वडाप वाहतूक व्यावसायिक सुधाकर महादेव हुल्ले यांनी आदमापुर येथील बाळूमामा दर्शनासाठी आलेल्या जगन्नाथ नरहरी तळेकर वय ८९ रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा यांना त्यांचे गहाळ झालेले पाकीट प्रामाणिकपणे परत दिले.

Advertisements

        काल रात्री ७ वा. देवदर्शनासाठी आलेल्या जगन्नाथ तळेकर यांना  मुधाळ तिट्ट्यावरून आदमापूर येथे वडाप व्यावसायिक सुधाकर महादेव हुल्ले यांनी मंदिराजवळ सोडले. हुल्ले गाडी घेवून आपल्या घरी यमगे येथे आले. सकाळी गाडीची स्वच्छता करताना गाडीत पाकिट सापडले.

Advertisements

पाकिटात सुमारे अडीच हजार रू. आधारकार्ड , पॅनकार्ड व मोबाईल नंबर लिहीलेला कागद सापडला. त्यातील काही मोबाईल  नंबर लावून पाहिले. पण त्यातील कोणाचाही फोन नंबर संपर्क होत नव्हता. शेवटी त्यातील एक नंबर स्वतः जगन्नाथ तळेकर यांचाच लागला. त्यावेळी तळेकर हे मुदाळ तिट्टयावर होते. त्यांना सकाळी ९ वा. मुरगूडला बोलावून घेतले. 

Advertisements

आणि त्यांना महत्त्वाची सर्व कागदपत्रे आणि रोख रक्कम असलेले पाकिट सुधाकर हुल्ले यांनी संभाजी मांगले, पांडूरंग मगदूम यांच्या उपस्थितीत जगन्नाथ तळेकर यांच्याकडे सुपुर्द केले. प्रामाणिकपणा हरवत चाललेल्या आजच्या जगात अशी काही प्रामाणिक लोक आहेत त्यामुळेच हे जग व्यवस्थितपणे चालू आहे अशी भावना श्री.तळेकर यांनी हे पाकीट स्वीकारताना व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!