मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरांमध्ये गेले काही दिवस पिवळसर रंगाचे दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत होत्या. अनेकांना आरोग्याच्या तक्रारी सुद्धा जाणवत होत्या. त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने व्हावा या मागणीसाठी मुरगूड शहरातील नागरिकांनी मुरगुड नगरपालिका मुख्याधिकारी संदीप घार्गे यांना निवेदन दिले.
दोन महिन्यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या तक्रारी जाणवत होत्या . त्याच्यावर तात्पुरती उपाययोजना करण्यात आल्या आणि आता पुन्हा तशाच पद्धतीचं पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केल्या.
त्यानुसार पाणीपुरवठा विभागाला योग्य सूचना देऊन पाणीपुरवठा शुद्ध करण्याच्या सूचना देऊ असे मुख्याधिकाऱ्यानी नागरिकांना सांगितले. यावेळी संतोष भोसले सुहास खराडे, पांडुरंग मगदूम ,सर्जेराव भाट, अमर सनगर, मयुर सावर्डेकर,ओंकार पोतदार,सचिन मांगले, रणजीत मोरबाळे, रोहित मोरबाळे,चेतन गोडबोले, पृथ्वी चव्हाण,प्रवीण नेसरीकर, सोमनाथ यरनाळकर, विशाल मंडलीक , प्रल्हाद भोपळे विक्रम घोरपडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते .