मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील बाजार पेठेतील सुवर्ण महोत्सवी श्री गणेश तरुण मंडळाची २०२३-२४ सालासाठीच्या कार्यकारिणी मंडळाची नियुक्ती नुकतीच पार पडली.
कार्यकारीनी निवडीच्या बैठकीत मयूर आंगज यांची सर्वांनुमते अध्यक्षपदी तर मयूर बोरगावे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर श्रेणिक भैरशेठ याची खजिनदारपदी आणि सतीश माळवदे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
श्री गणेश मंडळ व्यापारी पेठ मुरगूड हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर, व विविध सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ मानले जाते. या गणेश मंडळास पोलीस स्टेशनचा गणराया अवॉर्ड हा पुरस्कार दोन वेळा प्राप्त झाला आहे.
या वर्षीच्या गणेशोत्सव काळात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येतील असे नूतन अध्यक्ष मयूर आंगज यांनी सांगितले. निवडीवेळी मंडळाचे सर्व ज्येष्ठ सदस्यांसह इतर सदस्य उपस्थित होते.