कंत्रादाराने केले निकृष्ट दर्जाचे काम
पिंपळगाव खुर्द : पिंपळगाव खुर्द ता कागल येथे चौगले मळा याठिकाणी जाणारा रस्ता अवघ्या एका पावसाळ्यातच खराब झाला आहे. सुमारे 2 ते 3 महिन्यापूर्वीच हा रस्ता करण्यात आला होता मात्र अवघ्या 8 दिवसाच्या पावसाने रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत.
कागल मुरगुड रोड पासून चौगले मळा व डोंगर भागात जाण्यासाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून रस्ता करण्यात आला होता.मात्र अवघ्या एकाच पावसाने रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत ,तर काही ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेचा भाग खचला आहे.सुमारे 2 ते 3 महिन्यातच रस्त्याची ही अवस्था झाल्याने केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रस्ता करताना संबंधित लोकांनी रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले आहे की नाही असा सवाल पुढे येत आहे.
सदर रस्ता एक वर्ष भर ही टिकतो की नाही ,रस्ता नेमका कोणासाठी केलेला आहे ?नागरिकांच्या सोयीसाठी की कंत्राट दाराला काम मिळावे म्हणून? अशी संतप्त चर्चा सध्या नागरिकांमधून ऐकू येत आहे. सदर खराब झालेल्या रस्त्याला जबाबदार कोण ,लाखो रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याला दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा लाखो रुपये घालावे लागणार आहेत.याला जबाबदार नेमकं कोण? कंत्राटदार की संबंधित विभागाचे अभियंते?असे अनेक प्रश्न पुढे येत आहेत.