तीनशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे करणार वितरण
मुरगुड (शशी दरेकर) : सोशल मीडियावर जीवन विषयक अनेक संदेश येत असतात.मानसिक आनंद यात आहे, त्यात आहे.
खरा मानसिक आनंद दान करण्या मध्ये आहे,गरजूंना मदतीचा हात देण्यामध्ये आहे याचा आदर्श मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी यांच्या “सानिका स्पोर्ट्स ” फाऊंडेशनने घालून दिला आहे.
या फाऊंडेशन मार्फत दरवर्षी गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.एक दोन नव्हे तर तब्बल ३०० विद्यार्थ्यांना त्यामध्ये १ ली ते ४ थी च्या १०० विद्यार्थी विद्यार्थिनींना वह्या व पाण्याची बाटली. ई.५वी ते १० वी ला दप्तर बॅग व ११ ते १२ वी च्या १०० विद्यार्थिनींना छत्र्या देण्यात येणार आहेत. विशेष असे की हा उपक्रम गेली १५ वर्षे सुरू आहे.
परिसरातील अनेक गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला आहे. ‘नहि ज्ञानेंन सदृशम पावित्रम इह विद्यते ‘विद्येच्या प्रांगणात ज्ञानासारखे पवित्र असे दुसरे काहीही नाही. भगवत गीतेतील या शिकवणीचा आदर्श सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशन ने घालून दिला आहे.
त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गरजूंनी धनश्री चव्हाण व सागर सापळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सानिका स्पोर्ट्स च्या वतीने करण्यात आले आहे.