मुरगूड ( शशी दरेकर ) – राजर्षि छ. शाहू महाराजांच्या पुरोगीमी आचार विचारांचा जिल्हा म्हणून देशात कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. शाहूंच्याच विचारांचे लोक येथे आहेत. त्यामुळे राजर्षि छ . शाहूंच्या काळातील सर्वधर्म समभावाची परंपरा आपण सार्यांनी जपूया .जर कोठेही अनुचित प्रकार, समाजात तेढ निर्माण होणारी घटना घडत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि विकास बडवे यांनी केले. ते मुरगूड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती . सपोनि बडवे पुढे म्हणाले, कोणीही कोणाच्या धार्मिक भावना भडकावू नयेत. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. अशा घटनांना आपणच पायबंद घातला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी पुढाकार घेऊन अनुचित प्रकार घडू नयेत याची काळजी घ्यावी.
यावेळी चर्चेत दगडू शेणवी, बाळासाहेब मकानदार, महादेव कानकेकर, रविंद्र शिंदे, सरदार आत्तार यांनी भाग घेतला . यावेळी सरदार आत्तार, बाबासाहेब नदाफ , जमीर शिकलगार, धनाजी सेनापतीकर , संजय कांबळे, आप्पा रेपे , प्रविण सुर्यवंशी,ओंकार पोतदार , बादशहा महात आदी उपस्थित होते .