कागल, ता.३ : बालवयातील व्यसनाचे वाईट परिणाम होत असतात त्यापासून विद्यार्थ्यांनी दूर रहावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षक व आईवडीलांचे मोलाचे योगदान असते. शैक्षणिक जीवनात शिक्षण घेणे या कर्तव्यापासून विद्यार्थ्यांनी दूर जाऊ नये. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश बी. डी. गोरे यांनी केले.
येथील श्री यशवंतराव घाटगे स्कूलमध्ये व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी दिवाणी न्यायाधीश बी. डी. गोरे, सहदिवाणी न्यायाधीश ए. बी. जवळे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ॲड. अभिजीत शितोळे, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, पंचायत समितीच्या विशेष शिक्षिका वनिता साबणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी न्यायाधिश बी. डी. गोरे यांनी करियर विषयक, ॲड. अभिजीत शितोळे यांनी ‘पोक्सो कायदा’ , उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी ‘सायबर क्राईम व बाल लैगिंक अत्याचार कायदा’ याविषयी मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या विशेष शिक्षिका वनिता साबणे यांनी दिव्यांग दिनाचे महत्व सांगितले.
स्वागत मराठी विभाग प्रमुख अशोक घाटगे व प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन कु. संध्याराणी निंबाळकर हिने केले. आभार कु. दृष्टी ठोंबरे हिने मानले.
यावेळी संदीप सणगर , एस. एस. पाटील, यु. के. बामणे, डी. एस. कोष्टी, नरेंद्र बोते , जमीर ताशिलदार, सुनिल खोत उपस्थित होते.