व्हनाळी( सागर लोहार) : कागलचे ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबीपीरास श्री ‘अन्नपुर्णा’ शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि. केनवडे या कारखान्याच्यावतीने चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे हस्ते गलेफ अर्पण करण्यात आला.
कागल येथील गैबी देवस्थानच्या ऊरूसानिमित्त घाटगे कुटुबिंयाकडून या गलेफाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही कारखान्यामार्फत गलेफ अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते,ग्रामस्थ सर्वांना सुख शांती व निरोगी दिर्घायुष्य लाभो अशी श्री घाटगे यांनी प्रार्थना केली.
यावेळी ज्येष्ठ संचालक दिनकर पाटील,सुभाष करंजे,शिवसिंग घाटगे,विश्वास दिंडोर्ले,धनाजी गोधडे,एम.बी.पाटील,तानाजी पाटील,के.के.पाटील,मल्हारी पाटील,राजू भराडे, तसेच बंडा माने,अरूण तोडकर,व्ही.जी.पोवार,बाळासाहेब पाटील,शिवराज भरमकर,पवन पाटील,वैभव अडके आदी उपस्थीत होते.