कागल(विक्रांत कोरे) : कागल येथे नाभिक संघटनेच्या वतीने शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याप्रसंगी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ संचालक नविद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालखी सोहळ्यास व नगर प्रदक्षिणास विठ्ठल मंदिर कोल्हापूर वेळेस येथून सुरुवात करण्यात आली. अभिषेक व पादुका पूजन मारुती संकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोल्हापूर वेस, राधाकृष्ण मंदिर जवळ शिव मंदिर हॉल निपाणी वेस प्रदक्षिणा मार्ग व पालखी सोहळा संपन्न झाला. यामध्ये विठ्ठल भजनी मंडळ लिंगनूर दुमाला यांचे भजन सहवाद्यासह आकर्षण ठरत होते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्ष अनिल संकपाळ, तालुकाध्यक्ष समाधान कमळकर, शहराध्यक्ष बाळासाहेब माने, सेक्रेटरी तानाजी चौगुले, तुषार संकपाळ, अक्षय चव्हाण, सचिन गवळी, बाळासाहेब सूर्यवंशी, संतोष शिंदे, सचिन संकपाळ, अवधूत संकपाळ, किरण चव्हाण, आदींसह समाज बांधव माता- भगिनी उपस्थित होत्या.