कागल : किड्स हब इंग्लिश मीडियम स्कूल, कागल येथे तालुका विधी सेवा समिती, कागल आणि कागल वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंध व जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती श्री. ए. व्ही. मडके साहेब (अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, कागल तथा दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर) होते.

या कार्यक्रमास कागल वकील बार असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. सौ. सुनीता अनिल एकांडे, उपाध्यक्ष ॲड. सौ. अर्पणा ओंकार दिवाण, सचिव ॲड. सौ. मिनाक्षी सिरसे-जाधव, सदस्य ॲड. अभिजित एस. सांगावकर, ॲड. श्री. संभाजी आर. दावणे, ॲड. अभिजित एस. शितोळे तसेच शाळेच्या प्राचार्या वृशाली संदीप पाचगावे उपस्थित होत्या.
यावेळी माननीय न्यायमूर्ती श्री. ए. व्ही. मडके साहेब व उपस्थित विधिज्ञांनी विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाह प्रतिबंधक कायदा, मुलांचे हक्क, शिक्षणाचे महत्त्व तसेच बालविवाह रोखण्यासाठी समाजाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. बालविवाह ही सामाजिक समस्या असून तिचे निर्मूलन करण्यासाठी शिक्षण, जनजागृती आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहाविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच कायद्याची माहिती व सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घुयांबाजी धुरे मॅडम यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.
शिक्षण, जागृती आणि सुरक्षित बालपण हाच उज्ज्वल भविष्याचा पाया!.