मुरगूड (शशी दरेकर) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रौप्यमहोत्सवी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली ची विद्यार्थिनी कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर हीने प्रथम क्रमांक पटकावून ती सदाशिवराव मंडलिक चषकाची मानकरी ठरले. रूपये १०,००१/-रोख चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे…
द्वितीय क्रमांक -रु.७,००१/- चषक व प्रमाणत्र विजेती कु. अमृता पांडुरंग सागर (डी. के. शिंदे महाविद्यालय गडहिंग्लज)
तृतीय क्रमांक – रु.५००१/- चषक व प्रमाणत्र विजेता कु. सानिया उदय यादव (एम.के.एस.व्ही कॉलेज लांजा, रत्नागिरी)
चतुर्थ क्रमांक – रु.३००१/- चषक व प्रमाणत्र कु. अभय कृष्णकांत आळशी (मुंबई विद्यापीठ, मुंबई) तर उत्तेजनार्थ १,०००/-रूपये चषक आणि प्रमाणपत्र अशी एकूण पाच पारितोषिके होती. त्याचे विजेते पुढीलप्रमाणे १) कु.श्रुती राजू कुरणे (न्यू कॉलेज कोल्हापूर) २)कु.समीक्षा आनंदा पाटील (संत गजानन महाराज इंजि.कॉलेज गडहिंग्लज), ३)कु. अनिकेत रामा वानारे (जेधे महाविद्यालय पुणे) ४)कु.¬ऋतुजा सतिश पोवार (डी.के.टी.ई.कॉलेज इचलकरंजी) ५)कु.नितिन जगन्नाथ गागरे (कला, वाणिज्य महाविद्यालय वारजे, पुणे)

या स्पर्धेतील विजेत्यांना दिलेल्या बक्षिसांसाठी प्राचार्य. डॉ. अद्वैत जोशी, महात्मा फुले दूध संस्था चिमगाव- चषक, जय शिवराय एज्यु.सोसा. सर्व्हट्स को.ऑ.के. सोसा., मुरगूड, राजर्षि शाहू नागरी सहकारी पत संस्था मर्या; मुरगूड, जय शिवराय सह. दूध संस्था मर्या, मुरगूड, कै. महादेव होडगे सार्वजनिक वाचनालय, हरळी बु, प्राचार्य, डॉ. उदयकुमार शिंदे, प्रा. पांडुरंग सारंग, प्रा. तानाजी सातपुते, डॉ. सुखदेव एकल प्राचार्य डॉ टी एम पाटील या मान्यवरांनी आणि संस्थानी मदत केली.
या स्पर्धेसाठी जय शिवराय एज्यु.सोसा.चे सेक्रटरी मा.खास.प्रा. संजयदादा मंडलिक, संस्थेचे कार्याध्यक्ष मा. ॲड.विरेंद्रभैय्या मंडलिक, संस्थेचे अध्यक्ष मा. गजाननराव गंगापुरे, संस्थेचे कार्यवाह मा. आण्णासाहेब थोरवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य प्रा.डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते व इतर मान्यवर परीक्षक यांच्या शुभहस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ. शिवाजी होडगे होते. कार्यक्रमासाठी प्रा. पांडुरंग सारंग, तसेच राजर्षि शाहू नागरी सहकारी पत संस्थाचे मॅनेजर. ज्ञानदेव पाटील, जय शिवराय सह. दूध संस्थाचे संचालक लक्ष्मण सुतार, शाहू पतसंस्थेचे संचालक श्री .भोई आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.दत्ता देशपांडे, प्रा. माधव भोसले, प्रा. महेश कदम यांनी काम पाहिले. टाईम किपर म्हणून प्रा. दिगंबर गोरे, प्रा. सुशांत पाटील यांनी काम पाहिले.
नोंदणीसाठी प्रा. राकेश माने, प्रा. आशिष घाडगे, प्रा. नुतन बिरंबोळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी होडगे संयोजन समिती प्रमुख डॉ. सुखदेव एकल, प्रा. नितेश रायकर व संयोजन समितीचे सदस्यांनी केले.
या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. नितेश रायकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सुशांत पाटील प्रा. संजय हेरवाडे यांनी केलेआभार प्रा.दादासाहेब सरदेसाई यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.