वाघापूर (जोतीराम पोवार) : गेली महिनाभर मान्सून पावसाने ओढ दिल्याने येथील शेतकरी वर्ग चिंतेत आहे त्यात वळीव पावसाच्या भीतीने थोड्याफार प्रमाणात आहे ते भात, सोयाबीन, भुईमूग कापणी व मळणी करून चार दाणे पदरात पडून घेत समाधान मानत आहे मुळात संपूर्ण भुदरगड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असताना वाघापूर तालुका भुदरगड येथील तलाठी कार्यालयाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाचक अटींचे पालन करण्यास भाग पाडून शासनाच्या दुष्काळग्रस्त निधीपासून वंचित ठेवत आहेत.
सध्या काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भात सोयाबीन तसेच भुईमूग आधी पिकांची ही पीक पाहणे प्रणाली नोंद पूर्ण केली आहे वळीव पावसाच्या भीतीने काही शेतकऱ्यांनी अत्यल्प उत्पन्नाची कापणी केली आहे मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या तलाठी कार्यालयातील संबंधित अधिकारी शेतकऱ्यांना उद्धटपणाची वागणूक देऊन बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

तुमचे भात पीक शेतात उभे आहे का त्या पिकाचा जीपीएस प्रणाली फोटो आहे का पीक करपलेल्या स्थितीत आहे का आम्ही तेथे येऊन पाहणी करणार मगच तुम्हाला संबंधित फॉर्म भरता येणार अन्यथा नाही या व अशा जाचक अटी शेतकऱ्यांसमोर उभ्या केल्या जात आहेत मुळात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या भात पिकाची काढणी केली आहे.
आता या शेतकऱ्यांनी रिकाम्या वावराचा फोटो यांना दाखवायचा का हा वासून शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा आहे ज्या शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून भात व इतर पिके उभा केली दुष्काळाने ती जमीन उध्वस्त केली त्या शेतकऱ्यांच्या जखमेवर येथील तलाठी कार्यालय मीठ चोळत असून शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून संबंधित घटनेची भुदरगड तहसीलदार कार्यालयाकडून चौकशी करून सरसकट सर्वच पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ ग्रस्त निधीचा लाभ मिळवून द्यावा तसेच येथील तलाठी कार्यालयातील हिटलरशाही मुजुमदारी संपवण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ई पीक पाहाणी सदोष
मुळात शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या सातबारा आठ अ वर ई पीक पाहणी नोंद बंधनकारक करण्यास सांगत आले आहे मात्र येथील पीक पाहणी पूर्णपणे सदोष असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे बाधित शेतकऱ्यांचे मूळ क्षेत्र सोडून सुमारे 200 मीटर अंतरावर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात बाधित शेतकऱ्याचे क्षेत्र दाखवले जात आहे याला जबाबदार कोण शेतकरी की ढिसाळ प्रशासन यामुळे नाहक दुष्काळग्रस्त शेतकरी भरडला जात असून जे तलाठी कार्यालय शेतकऱ्यांना जाचक अटी ऐकवत आहे त्यांनी आपल्या सदोष यंत्रणेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे