दूधगंगा नदीत मासेमारीसाठी गेलेला तरुण बेपत्ता; एनडीआरएफकडून शोधमोहीम सुरू

कागल : दूधगंगा नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेला एक तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. नदीकाठी या तरुणाचे कपडे आणि मोटरसायकल आढळून आल्याने तो नदीच्या पात्रात बुडाला असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisements

सचिन दादाराव चव्हाण (वय ३७) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन चव्हाण हे गेल्या चार दिवसांपासून कागल येथील शाहूनगर वसाहतीत राहत होते. गुरुवारी दुपारपासून ते बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Advertisements

घटनास्थळी एनडीआरएफचे (NDRF) पथक दाखल झाले असून नदीपात्रात सचिन चव्हाण यांचा शोध घेण्यासाठी मोहीम वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे शाहूनगर आणि कागल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!