कागल चेकपोस्टजवळ नियमबाह्य ‘रंब्लर्स’मुळे अपघातांचा धोका वाढला; शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

कागल (प्रतिनिधी): कागल येथील चेकपोस्ट नाक्याजवळील महामार्गावर अदानी समूह आणि नॅशनल हायवे अथॉरिटीतर्फे (NHAI) बसवण्यात आलेल्या रंब्लर्सच्या (वेगरोधक) पद्धतीवर वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे रंब्लर्स चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आल्याने अपघातांना उघडपणे निमंत्रण मिळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

Advertisements

वाहने या रंब्लर्सवरून जात असताना वाहनाचा तोल जाऊन चालकाचे नियंत्रण सुटते. त्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन आदळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनचालकांना हे रंब्लर्स स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिकच गंभीर बनला आहे.

Advertisements

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ या रंब्लर्सची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नियमानुसार योग्य पद्धतीने त्यांची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रंब्लर्सची दुरुस्ती त्वरित न केल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना कागल शहर प्रमुख अजित मोरेकर यांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!