कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्येण्याचे आवाहन

कोल्हापूर : सन 2026-27 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 कोटी 50 लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 50 लाख रुपयांचा लक्षांक मंजूर करण्यात आला आहे.

Advertisements

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टर या बाबीसाठी 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत, तर इतर कृषी यंत्रे व औजारांसाठी 50 टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे व औजारे, पॉवर टिलरचलित यंत्रे व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैलचलित औजारे, प्रक्रिया युनिट्स तसेच भाडेतत्त्वावर कृषी यंत्रे व औजारे सेवा पुरवठा केंद्र / औजारे बँक उभारणी आदी बाबींचा समावेश आहे.

Advertisements

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in किंवा महाविस्तार AI ॲप वर अर्ज करावेत. योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संबंधित गावचे सहाय्यक कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.

Leave a Comment

error: Content is protected !!