मुरगूड नागरी पतसंस्थेच्या मुख्य शाखा इमारत नुतनीकरण उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सरपिराजी रोड येथे असणाऱ्या “मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा उदघाटन समारंभ मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला .

Advertisements

MJ लकी स्कूलच्या मुला -मुलींचे लेझीम पथक व सुवाद्याच्या गजरात डॉ देशमुख काकांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी काकांचेआगमन झालेनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली .

Advertisements

    पद्म पुरस्कार प्राप्त , अंतरराष्ट्रीय प्रवचनकार मा .डॉ . श्रीकृष्ण देशमुख ( काका ) यांच्या शुभहस्ते फित कापून नुतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचा शुभारंभ करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक मा . हाजी धोंडीबा उर्फ बाळासाहेब मकानदार होते .

    यावेळी अद्यावत लॉकर्सचे उदघाटन मा . तानाजीराव सुर्यवंशी ( उद्योजक ) यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी चेअरमन जावेद मकानदार म्हणाले अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात १७ कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करून सहकार क्षेत्रात संस्था गरूडझेप घेत आहे .
मुदतबंद ठेव , मुरगूड नागरी लक्ष्मी दामदुप्पट ठेव , मुरगूड नागरी लखपती योजना , सुवर्ण ठेव योजना , त्याचबरोबर सोने तारण कर्ज , वाहन तारण कर्ज , स्थावर तारण कर्ज , सभासद कर्ज, व्यापार वृध्दीसाठी कर्ज अशी मुरगूड नागरी सह . पतसंस्थेची वैशिष्ठे असून सभासद , हितचितकांच्या विश्वासास पात्र राहून संस्थेची घौडदौड सुरु असल्याचे त्यानी सांगितले .

Advertisements

    यावेळी मुरगूडच्या विठ्ठल मंदिराला २५ टाळ खरेदी करण्यासाठी ११००० रुपयाचा धनादेश श्री. चंदकांत तिकोडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला . त्याचबरोबरोबर सर्व सभासदानां सुमारे ५०० ग्रॅम वजनाचे स्टील ताटाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

    याप्रसंगी मुरगूड नगरपरिषदेचे गटनेते सुहास खराडे , माजी पी .एस.आय पांडूरंग कुडवे, निवास कदम , वाय.एस. पाटील सुरुपलीकर , जोतिराम सुर्यवंशी , वस्ताद आनंदा गोधडे , या मान्यवरासह

  कार्यक्रम सोहळ्यास संचालक सर्वश्री डॉ . संजयकुमार रामशे , राजन ताशिलदार , सचिन जाधव , राजेंद्र बुरुड , नवीज खेडेकर , दिलीप सोनुले , संचालिका सौ . कांचन खराडे , ज्योती शिंदे , मॅनेंजर अजितकुमार कापसे यांच्यासह कर्मचारी वर्ग ,  सभासद , ठेवीदार , हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते .प्रास्ताविक अजितकुमार कापसे यानीं केले . तर आभार ऋषिकेष गोडबोले यानीं मानले .

Leave a Comment

error: Content is protected !!