परिश्रमपूर्वक स्वावलंबी जीवन जगण्यात सार्थकता – कॉ. भीमराव कांबळे

मुरगूड (शशी दरेकर) – महात्मा गांधी ‘ महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला आजही तारक आहेत त्यांच्या तत्वानुसार सत्याच्या मार्गाने परिश्रमपूर्वक  व स्वावलंबी जीवन जगण्यात खरी सार्थकता आहे असे प्रतिपादन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष कॉ भीमराव कांबळे यांनी केले.

Advertisements

       मुरगूडच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात सामाजिक कार्यकर्ते कवी व साहित्यिक स्वर्गीय दीपक वर्णे यांचा १४ वा स्मृतीदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित व्याख्यानात कॉ. भीमराव कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी सखाराम सावर्डेकर होते तर  ज्येष्ठ कवी भैरवनाथ डवरी ‘ व मनाजी सासणे प्रमुख उपस्थित होते.

Advertisements

             या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार प्रा सुनिल डेळेकर यांनी केले. यावेळी बोलताना भैरवनाथ डवरी म्हणाले ‘ समाजासी नेहमी नाळ ठेवून अंत्यंत स्वाभिमानाने जीवन जगण्याचा प्रयत्न कै दिपक वर्णे यांनी केला. त्यांचा कौटुंबिक त्याग व परिस्थितीवर मात कशी करावी हा आदर्शाचा नमुना आहे.

            यावेळी निवृत्त गटशिक्षणाधिकारी पी आर पाटील यांनी प्रदीप वर्णे हे आपल्या भावाविषयी नेहमी आस्था ठेवून त्यांच्या आदराप्रित्यर्थ प्रत्येकवर्षी  स्मृतीदिन साजरा करतात हा आजच्या जगात दूर्मिळ योग आहे. यावेळी आदर्श शिक्षक अशोक डवरी व प्रदीप वर्णे यांनी मनोगत व्यक्त केले.

Advertisements

             कार्यक्रमास जयवंत हावळ ‘ शाहू फर्नांडीस ‘ प्रा तुकाराम पाटील , कॉ बबन बारदेस्कर सिकंदर जमादार बळीराम पाटील आदि उपस्थित होते . सचिन सुतार यांनी सूत्रसंचालन केले तर  प्रा . किशोर पाटील यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!