पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

मुरगूड ( शशी दरेकर ) : सध्या पावसाळा सुरू झाल्याने जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. मुरगूड नगरपरिषद कडुन शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे तथापी अति पावसामुळे गढूळ पाणी पुरवठा झालेस , कॉलरा, टायफॉइड, कावीळ यांसारख्या  जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

Advertisements

यासाठी नागरिकांनी १५ ते २० मिनिटे पाणी उकळून थंड केलेले पाणी पिणे तसेच  जुलै महिना डेंग्यू जनजागृती मोहिम अंतर्गत तसेच नियमितपणे घरातील खर्चासाठी वापरत असलेले सर्व पाणी साठे  सिंमेट टाकी, बॅरल, आठवड्यातून एखदा घासुन पूसुन स्वच्छ धूवावेत व सर्व पाणी साठे पूर्ण पणे झाकून ठेवावेत, फ्रिज, कुलर यामधील पाणी वरचेवर बदलावे, घरातील किंवा परिसरातील भंगार साहित्य टायर योग्य ती विल्हेवाट लावावी, कुंडीत पाणी साठणार नाही व घराजवळील पाणी साचू देऊ नये, तसेच ताप, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणे दिसल्यास ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे तपासणी करावी.

Advertisements

मुरगूड नगरपालिकेतर्फे शहरातील पाण्याचे क्लोरीनीकरण, फवारणी आणि स्वच्छता मोहीम व ग्रामीण रुग्णालय मुरगूड, कापशीरोड येथील नागरी आरोग्य  केंद्र व  बाळासाहेब ठाकरे ” आपला दवाखाना “तुकाराम चौक मुरगूड मधील आरोग्य कर्मचारी यांचेकडून सर्वेक्षण केले जात आहे तरी मुरगूड शहरातील सर्व नागरिकांनी वरीलप्रमाणे योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन मुरगूड नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय मुरगूड यांनी केले आहे.

  यावेळी डॉ. प्रविण कंदाडे, वैद्यकीय अधिक्षक व महेश शिवाजी जाधव, आरोग्य सेवक, ग्रामीण रुग्णालय मुरगूड मधील कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!