भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता महत्त्वाची – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता महत्त्वाची असून त्यांनी समाजासाठी  अस्पृश्यता आणि विषमतेवर लढा दिला जातीभेद यासारख्या सामाजिक विकृतीना प्रखर विरोध करत त्यांनी समाजसुधारणेची चळवळ उभी केली असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisements

डॉ. होडगे पुढे म्हणाले की भारतीय संविधानातून सर्व नागरिकांना समानता स्वातंत्र्य आणि बंधुता  यांचा अधिकार मिळाला परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणानेच माणूस आपले नशीब बदलू शकतो हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून समाजाला दाखवून दिले. स्त्रियांना सन्मान मिळावा म्हणून त्यांच्यासाठी हिंदू कोड बिल मांडले.

Advertisements

विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.होडगे यांनी केले . शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले
या कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक महादेव भोई अकाऊंट राजेंद्र मंडलिक बी सी ए चे विभाग प्रमुख प्रा. विनायक माने प्रा.स्नेहा हवलदार अमृता पाटील, संग्राम भोसले, रोहित परीट ,  विद्यार्थी उपस्थित होते .आभार प्रा .विनायक माने यांनी मांडले

Leave a Comment

error: Content is protected !!