प्रत्येक नृत्यांच्या गाण्यावर प्रेक्षकांसह पालकांनी टाळ्यांची दिली दाद
मुरगूड (शशी दरेकर) : सरवडे, तालुका राधानगरी येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे जिज्ञासा प्री – प्राइमरी स्कूल सरवडेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.

प्रथम स्नेहसंमेलनाचे उद्दघाटन व विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मा .श्री बळीराम रेपे यांच्या हस्ते करण्यात आले . दीपप्रज्वलन मा . श्री.सुभाष कोतमिरे , पत्रकार शशी दरेकर , बाबासाहेब रेपे, चंद्रशेखर घोडके , भिमराव रेपे , अर्जुन रेपे, ,स्वप्निल खोराटे, प्रविण पोवार , अशोक शिंदे , सौ . दिप्ती मोरे , सौ . मालुताई राजिगरे या मान्यवरानीं केले.

दीप स्वतः रात्रभर जळतो पण इतरानां प्रकाश देतो .जेष्ठांची पिढी नातवंडासाठी असाच त्याग करत असते असा संदेश या दीपप्रज्वलनातून दिला आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशाला वंदन करुन ” गजानना गणराया ” या गीतावर ग्रुपडान्स सादर करण्यात आला .यानंतर मल्हारी मल्हारी , काठीनं घोंगड घेऊ द्या , लिंबूनिच लिंबू, हम तो ऐसे है भैया.., शेतकरी गीत , मराठ मोळ गाणं , युगत मांडली, स्कूल चले हम, शिवबा राज , ऐका दाजिबा- लावणी ,देशभक्तीपर गीत, अशा अनेक गाण्यावर उपस्थितानीं टाळ्यांच्या गजरात दाद दिली त्यातील *छावा* गाणे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी सिंगल गाणी श्लोक पठण ( विरा रेपे ) , देवा श्रीगणेशा , केळेवाली , गुलाबाची कळी ,एक नंबर , खेळताना रंग बाई होळीचा , बरसो रे मेघा , चाकधूम .., गलतीसे मिस्टेक ,चन्नाप्पा चने गौडा , भावा आपलीच हवा , दिल है छोटासा … अशा बालचमुंच्या अनेक गीतांच्या नृत्यावर उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

या स्नेहसमेंलन कार्यक्रमास मान्यवरांसह, महिलावर्ग, श्रोते मोठया संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ .दिपाली रेपे, संस्थापिका सौ.सुवर्णाताई रेपे ,
शिक्षिका सौ. कांचन कांबळे, सौ .पूजा जाधव, सौ सुजाता पाटील, सौ . अपर्णा पाटीत, स्वाती सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्वागत कांचन कांबळे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. दिपाली रेपे यानीं केले तर आभार सौ.अपर्णा पाटील यानी मानले.