बिद्री येथे १ लाख ५३ हजार रु किंमतीचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

Advertisements

मुरगूड ( शशी दरेकर ) :- बिद्री ता. कागल येथे गुटखा विक्री करणाऱ्या उदय भिकाजी ढेकळे (वय ३९ वर्षे ) रा. मजरे कासारवाडा ता. राधानगरी या किराणा दुकान व्यावसायिकावर  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली केली. या कारवाईत त्याच्या जवळील १ लाख ५३ हजार २५२ रु. किमतीचा गुटखा जप्त केला.

           याबाबत माहिती अशी कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक  योगेश कुमार यांनी राज्यामध्ये गुटखा विक्री व साठ्याबाबत राज्य शासनाने बंदी घातलेली असताना अशा अवैध धंदयावर छापा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आपले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव यांचे पथकातील पोलीस अमलदार अरविंद पाटील, विजय इंगळे, रोहीत मर्दाने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिद्री कारखाना साईटवरील मटण मार्केट समोर विघ्नहर्ता ट्रेडर्स नावाच्या दुकानामध्ये  बेकायदेशीर अवैध रित्या गुटख्याचा साठा व विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी कारवाईच्या वेळी वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, सुगंधी सुपारी मुद्देमाल जप्त केला. आणि मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

         कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक  योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार रोहित मर्दाने, विजय इंगळे, युवराज पाटील, अमित सर्जे, अरविंद पाटील, सुशील पाटील, सचिन पारखे, जयवंत ढोकरे यांनी सहभाग घेतला.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!