आदमापूरचे बाळूमामा मंदिर ३ ते ६ मार्च अखे दर्शनासाठी बंद

मुरगूड (शशी दरेकर) : महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु बाळूमामा मंदिर ३ मार्च ते ६ मार्च २०२६ अखेर चार दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे.

Advertisements

७ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवानिमित्त मंदिर, अन्नछत्र, भक्तनिवास, देणगी विभाग या ठिकाणची स्वच्छता करायची असल्यामुळे सदर मंदिर ४ दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे.

Advertisements

याची नोंद भाविकांनी घेऊन सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!