देशभक्तीने भारलेल्या वातावरणात मुरगूड मध्ये विविध ठिकाणी  प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण मुरगूड मध्ये विविध ठिकाणी अत्यंत उत्साहात व देशभक्तीने भारलेल्या वातावरणात संपन्न झाले. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते हुतात्मा तुकाराम चौकातील ध्वजारोहण करण्यात आले. नगर परिषदेत समोरील ध्वजारोहण उपनगराध्यक्षा श्रीमती रेखा आनंद मांगले यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा स्मारकामधील ध्वजारोहण विठ्ठल हरिभाऊ भारमल, सुलोचना देवी बालवाडी समोरील ध्वजारोहण नगरसेविका गीतांजली संभाजी आंगज यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सर्व  कार्यक्रमात  नगरसेवक, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शालेय विदयार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisements

    शाहू ग्रुप कार्यालयात नगरसेवक राजीगरे तसेच श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे ध्वजारोहन जेष्ठ संचालक साताप्पा पाटील, हुतात्मा तुकाराम वाचनालयातील किरण गवाणकर तर एम जे इंटरनॅशनल स्कूल मध्ये भारतीय जवानांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. शहरातील पसंस्था, शासकीय कार्यलये, प्राथमिक, माध्यमिक,व उच्च महाविद्यालयातून तेथील प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुलांना जिलेबी वाटण्यात आली.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!