स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी
मुरगूड ( शशी दरेकर ) : पोलीस अधीक्षक, योगेशकुमार गुप्ता यांनी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अवैद्य व्यवसायाची माहिती काढून परीणाम कारक कारवाई करून अवैद्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणेचे उद्देश्याने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे ,प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत.
पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकरवी अवैद्य व्यवसाची माहिती काढुन परीणाम कारक कारवाई करुन अवैद्य व्यवसायाचे समुळ उच्चाटन करणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून कोल्हापूर जिल्हयातील अवैध व्यवसायाबाबत माहिती उपलब्ध करुन कारवाई काम चालु असताना पोलीस अंमलदार विजय इंगळे व रोहित मर्दाने यांना गोपनीय विश्वासु

बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बिद्री ता. कागल, जि. कोल्हापूर या ठिकाणी बलुगडे यांचे विहिरीजवळ ताडपत्रीच्या उघडया शेडमध्ये काही इसम पत्त्यांच्या पानांवर पैसे लावुन जुगार खेळ खेळत आहेत. सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदिप केंद्र, राजू कोरे, अमित सर्जे, युवराज पाटील यांच्या पथकाने मिळाले
बातमीचे ठिकाणी विद्री ता कागल येथे जावून बलुगडे यांचे विहिरीजवळ ताडपत्रीचे तात्पुरते तयार केलेल्या उघडया शेडमध्ये रमी नावाचा पत्याचे पानाचा चालू जुगार खेळावर दि. 21/01/2026 रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी (1) प्रविण मारुती साठे, व.व.48, रा. जाधव गल्ली, बोरवडे ता कागल जि कोल्हापूर 2) जयसिंग अशोक पावरुट, व.व. 38, रा. कुंभारवाडा, बोरवडे ता कागल, जि. कोल्हापूर 3) दिलीप रामचंद डाफळे, व.व.57, रा. परीट गल्ली, बोरवडे, ता. कागल जि. कोल्हापूर 4) पांडुरंग नागोजी सुतार, व.व.55. रा. म्हसोबा गल्ली, बोरवडे, ता कागल, जि. कोल्हापूर 5) महादेव केरबा साठे, व.व.46, रा. साठे माळ रोड, बोरवडे, ता कागल, जि. कोल्हापूर 6) संदिप दत्तात्रय यादव, व.व.45, रा. विठठल मंदिर जवळ, बोरवडे, ता कागल, जि. कोल्हापूर 7) दिलीप भानुदास कदम, व.व.60. रा. खोपडा गल्ली, बोरवडे, ता कागल, जि. कोल्हापूर 8) प्रकाश वसंत पाटील, व.व.50, रा. विठठल मंदिर गल्ली, बोरवडे ता कागल, जि. कोल्हापूर हे जुगार खेळत असताना मिळून आले.सदर छापा कारवाईत 19.390/- रुपये रोख रक्कम, 06 मोबाईल हँण्डसेट, 06 मोटार सायकल व जुगार गुन्ह्याचे इतर साहित्य असा मिळून एकुण 3,50,390/- रुपये किंमतीचा जुगाराचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर इसमांचे विरुध्द मुरगूड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मुरगूड पोलीस ठाणे मार्फत सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक. योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक वी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, सुशांत चव्हाण, पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार विजय इंगळे, रोहित मर्दाने, संदिप केंद्र, राजू कोरे, अमित सर्जे, युवराज पाटील यांनी केली आहे.