मुरगूड ( शशी दरेकर )
शिवराज विद्यालय मुरगूडच्या १०वी मधील १९७८ बॅचचा स्नेहमेळावा सदाशिव मंडलिक महाविद्यालयाच्या कै. दादोबा मंडलिक सभागृहात संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे होते तर अध्यक्षस्थानी पी डी मगदूम होते.
कार्यक्रमात प्रथम सन्माननिय गुरुवर्यांच्या हस्ते दिपप्रजलन तसेच सावित्रीबाई फुले, छ. शिवाजी महाराज, कै. सदाशिवराव मंडलिक साहेब, व त्यावेळचे मुख्याध्यापक कै .एन्.के. पठाडे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर स्वर्गवाशी झालेले गुरुवर्य, त्यावेळचे दिवंगत वर्गमित्र यानां श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी विद्यापिठाचे अधिसभा (सिनेट ) सदस्य विष्णू खाडे यानी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
शालेय जीवनातील अनेक आठवणी मनाच्या कप्प्यात कुठेतरी जिवंत असतानांच वेगवेगळ्या कारणानीं अनेक वर्गमित्र एकमेकापासून दूर गेले. मात्र शाळेतील मित्रांच्या, गुरुजनांच्या आठवणी कायमपणे स्मरणात राहिल्या.
या आठवणी उलगडण्यासाठी मुरगूडच्या शिवराज विद्यालयाच्या १९७८च्या बॅचच्या वर्गमित्रानी तब्बल ४७ वर्षानीं पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आणि मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय येथिल कै. दादोबा मंडलिक सभागृह येथे हा स्नेहमेळावा उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
शाळेतील बेंच, मस्ती, उनाडपणा, खोडया, शिक्षकांचे प्रेम, त्यानीं चुकी बद्दल दिलेली शिक्षा आणि निरागस मैत्रिचा तो काळ सगळं काही पुन्हा शालेय जीवनातील आठवणीत प्रत्येक विद्यार्थी -विद्यार्थिनिचे मन रमून गेलं होत.
अरे विष्ण्या, बाळ्या, दिल्या, जया, शश्या हाकांमधून मैत्रिचा उत्साह ओसंडून वाहत होता.
वर्गात अभ्यास करणारे, खळखळून हसणारे ते विद्यार्थी -विद्यार्थिनी आज कोणी शेतकरी, कोणी उद्योजग, कोणी शिक्षक तर कोणी गृहीणी, समाजसेवक बनले आहेत. कोणी वेगवेगळ्या पदावरून सेवानिवृत आहेत.
हा सर्व गोतावळा एकत्र येऊन आपापल्या यशस्वी प्रवासाच्या कथा प्रत्येकानीं कथन केल्या.
यावेळी पी व्ही पाटील, विष्णूपंत खैरे, बी .एच गुजर, बी .जी साखळकर, आय.एन्. बेग, वाय.आर.जाधव, पी.टी. ढेरे, भिमराव पाटील, या गुरुजनानी त्या वेळच्या आठवणी कथन केल्या.
यावेळी अध्यक्षिय भाषणात पी.डी. मगदूम सर यानीं अनेक आठवणी सांगून त्यावेळचे विद्यार्थी नम्र होते असे नमुद केले. याच बरोबर माझे बायपासचे ऑपरेशन वेळी B निगेटिव्ह रक्त मिळत नव्हते. बेळगांवच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येऊन माझा विद्यार्थी शशी दरेकर याने B निगेटिव्ह रक्त देऊन मला “गुरुदक्षिणा” दिल्याचे त्यानी आवर्जुन सांगितले.
यावेळी विष्णू खाडे, जयवंत भारमल, शशी दरेकऱ, दिलीप खैरे, पांडूरंग खराडे, रंगराव पाटील, आनंदा जाधव, दिगंबर परीट, श्रीकांत मिठारी , शिवाजी परीट , दिलीप शिंदे, जयवंत शिंदे, शंकर पाटील, शांताराम शिंदे , रामचंद्र हवालदार, बाबासो नदाफ, दिलीप पाटील, विलास शिंदे, विलास गवाणकर, शिवाजी एक्कल, वंदना कामत, सुनिता गंगापूरे, उषा करडे, सुनिता गाडगीळ, यशोदा पाटील, सुवर्णा पाटील, सुलोचना बहिरशेट, शोभा पोवार ,यांच्यासह माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर कमळकर यानीं तर आभार आनंदा जाधव यानीं मानले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
