मुरगूड ( शशी दरेकर ):
निढोरी ता. कागल येथे ओम साई गणेश कला, क्रीडा, सांस्कृतिक मंच प्रणित सुवर्ण गणेश मंदिर अर्थात गोल्डन टेम्पलच्या वतीने उद्या गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटे श्रीं ना अभिषेक, सकाळी नगरप्रदक्षिणा, दुपारी १२ वा. जन्म काळ, सायंकाळी ७ वा. श्री गणेश जागर म्हणून श्री संत सद्गुरु बाळूमामा संगीत भजनी मंडळ मुरगुड यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वा. पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविक भक्तांना लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Advertisements
AD1