विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांकडून चोप

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील रानडे विद्यालयातील सहाय्यक शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केले. हा प्रकार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. पालकांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकास बेदम चोप दिला. निसारीअहमद मोहीदिन मुल्ला, रा. कापशी तालुका कागल असे त्या नराधम शिक्षकाचे नाव आहे. त्या शिक्षकास अटक करून पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. कापशी परिसरात या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करीत संपूर्ण बाजारपेठ कडक बंद ठेवण्यात आली होती.  

Advertisements

             पोलिसांकडून व  घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार ,रानडे विद्यालयात निसारी मुल्ला हे सहाय्यक शिक्षक म्हणुन गेल्या काही वर्षापासुन कार्यरत आहेत. त्यांचे शाळेत मुलीच्या अंगाशी गैरवर्तन करणे व अश्लिल शब्द वापरण्याचे प्रमाण काही महिण्यापासुन चालु होते. त्यांच्या या वर्तनाबद्दल शालेय व्यवस्थापण व मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांनी त्याच्या वर कारवाई केली नाही. त्यामुळे त्याच्या वागण्यात बदल झाला नाही. त्याच्या कडुन वारंवार प्रकार वाढतच गेले. त्यामुळे त्या पीडित मुलीने झालेला प्रकार आपल्या पालकांस सांगितला. 

Advertisements

पालकांनी मुल्ला यांला बेदम मारहान केली.गेल्या मागील काही वर्षापूर्वी मुल्ला यांने मुरगुड शाळेत मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रकार केला तेथेही पालकांनी बेदाम चोप दिला होता.त्यामुळे त्याची बदली कापशी रानडे हायस्कूल येथे  करण्यात आली होती.

Advertisements

गेल्या काही महिण्यापासुन मुल्ला याचे पिडीत मुलीशी अश्लील वर्तन करण्याचे चालु होते. मात्र तक्रार करण्यास पुढे कोणी आले नाही. होणारा छळ सहन न झाल्याने त्या मुलीनेआपल्या पालकांना सांगितले. आज सर्व पालक शाळेसमोर येताच पालकांचा  राग आनावर झाला व शाळेच्या आवारातच मुल्ला यांना बेदम चोप देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला शाळेच्या कार्यालयात नेण्यात आले. पालकांचा राग आनावर झाल्याने आँफिसमध्ये जाऊन मुल्ला यांना माराहान केली.

गाव बंद ठेवून घटनेचा निषेध, मंत्र्यांचे कारवाईचे आदेश

                या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलिस घटनास्थळी हजर झाले .घटनेचे गाभिर्य लक्षात घेऊन मुल्ल्ला याला मुरगुड पोलिस स्टेशनला नेण्यात आले. मुल्ला याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी पालकांनी पोलिस गाडीला घेराव घातला. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पालकानी गाडी सोडली. ग्रामस्थ व पालकांनी मुल्ला याचा तिव्र निषेध करीत  त्यांच्याविरूद्ध  जोरदार घोषनाबाजी केली.

       तसेच या घटनेचा निषेध म्हणून कापशी बाजार पेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. मुल्ला याच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वसन सहाय्यक  पोलिस उप अधिक्षक ए.बी पवार यांनी दिले. संस्थेचे वरिष्ठ लिपिक यांनी शिक्षक मुलायास बडतर्फ केलेचे सांगितले. यावेळी  घटनेचे गाभिर्य लक्षात घेवुन पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

नराधमावर कडक कारवाई करा – मंत्री हसन मुश्रीफ
         रानडे हायस्कूल मधिल निसार मुल्ला या शिक्षकाने मुलीशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल पोलिस अधिका-याना  फोन करुन मुल्ला या नराधमाला अटक करुन  कडक कार्यवाई करण्याचे तात्काळ आदेश नाम. हसन मुश्रीफ यांनी दिले. शिक्षकी पेशाला काळीम्मा फासणारी घटना घडल्याने, कापसी परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पूढील तपास मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे हे करीत आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!